Kolhapur Crime : गोव्यात विक्रीसाठी असणाऱ्या मद्याच्या अवैध वाहतुकीवर छापा, सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
गोव्यात विक्रीसाठी असणाऱ्या मद्याच्या अवैध वाहतुकीवर छापा टाकत राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने सव्वा दोन लाख रुपयांच्या दारुसह सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Kolhapur Crime : फक्त गोव्यात विक्रीसाठी असणाऱ्या मद्याच्या अवैध वाहतुकीवर छापा टाकत राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने सव्वा दोन लाख रुपयांच्या दारुसह सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विभागाने शेर्ले गावच्या हद्दीत, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे छापा टाकून काल ही कारवाई करण्यात आली.
श्रीकृष्ण सुभाष कदमला (वय 32, रा. घर नं. 71 चव्हाटेश्वर मंदिर हुमरमळा, अणाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कारही जप्त केली आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छापा टाकला असता कागदी पुठ्ठयाच्या बॉक्समध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली भारतीय बनावटीची विदेशी मद्य विविध ब्रॅन्डच्या 750 मिलीच्या एकूण 420 सिलबंद प्लास्टीकच्या बाटल्या, बिअर 500 मिली क्षमतेच्या 120 सीलबंद टीन स्विफ्ट कारमध्ये (MH-04-GE-9098) एकूण 40 बॉक्स मिळून आले.
सदरची कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या पथकाने विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर बी. एच. तडवी, यांचे आदेशाने निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर व कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दिपक कापसे यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर करीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या