(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur crime : मेहुणीने पत्नीला वाईटमार्गाला लावल्याने अनैतिक संबंध जुळले, पत्नीवर वार करून पतीची आत्महत्या
सुसाईड नोटमध्ये मेहुणी दीपालीने वारंवार मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे. पत्नीच्या नावे पैसे काढून ते भरले नाहीत. नवरा बायकोमध्ये सातत्याने भांडणे लावून पत्नीला वाईट मार्गाला लावल्याचे म्हटले आहे.
Kolhapur Crime : दोन मेहुण्या, साडू, दुसऱ्या पत्नीचा मित्र यांच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना जयसिंगपूरमध्ये घडली. आत्महत्या केलेल्या पतीचे नाव कृष्णा लक्ष्मण धंगेकर असे नाव आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीवर धारदार शस्त्रांनी वार करून जखमी केले. जखमी पत्नी कोमल धंगेकरवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कृष्णा धंगेकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहिली आहे.
आत्महत्या केलेले कृष्णा हाॅटेल व्यावसायिक होते. त्यांनी 10 वर्षांपूर्वी दुसरं लग्न केलं असून त्यांना 7 वर्षांची मुलगी आहे. पहिली पत्नी चिपरीमध्ये राहते.
सुसाईड नोटमध्ये कृष्णा यांनी मेहुणी दीपालीने वारंवार मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे.पत्नीच्या नावे पैसे काढून ते भरले नाहीत. आमच्या नवरा बायकोमध्ये सातत्याने भांडणे लावून पत्नीला वाईट मार्गाला लावले. यामधूनच पत्नीचे विजय धाब्याचे विजय येवलेशी अनैतिक संबंध जुळले. विजय सोडचिठ्ठी देण्यासाठी धमकी देत होता. त्याचबरोबर मेहुणी दीपाली आणि सरला सुद्धा सोडचिठ्ठी देण्यास सांगत होत्या. त्यामुळेच मेहुणी दीपाली, सरला, साडू राजेंद्र व विजय येवले माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. त्यांनी चिठ्ठीवर सही केली आहे.
विजय मुरलीधर धंगेकर यांनी मेहुणी दीपाली राजेंद्र हरकल, साडू राजेंद्र हरकल, आणखी एक मेव्हणी सरला गोडसे आणि विजय धाब्याचा मालक विजय येवले यांच्याविरोधात फिर्याद दिली. पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धंगेकर पती पत्नी जयसिंगपूरमधील दत्त काॅलनीत भाड्याने राहत होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur : होम मिनिस्टरमध्ये अवतरली कोल्हापुरी' उखाणा क्वीन' ! Non Stop सव्वा तीन मिनिटांच्या उखाण्यात अख्खं कोल्हापूर फिरवलं !
- कोल्हापूर जिल्ह्यावर यंदाही महापुराची टांगती तलवार, सरासरीच्या तुलनेत 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज
- Kolhapur Municipal Corporation elections 2022 : कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर