एक्स्प्लोर

Hasan Mushrif: जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानचा शत्रू, औरंगजेब आपला होऊच शकत नाही; हसन मुश्रीफांचे परखड बोल

धर्मा-धर्मात तेढ वाढवून सामाजिक विद्वेष करण्याच्या दृष्टिकोनातून कोणी कितीही चिथावणी देऊ देत. अशा चिथावणीखोरांना बळी पडू नका. सावध राहा-दक्ष रहा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफांनी केले. 

Hasan Mushrif: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांचे रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच, त्यामुळे औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, औरंगजेब हा आपला शत्रूच आहे, असे परखड बोल माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. धर्मा-धर्मात तेढ वाढवून सामाजिक विद्वेष करण्याच्या दृष्टिकोनातून कोणी कितीही चिथावणी देऊ देत. अशा चिथावणीखोरांना बळी पडू नका. सावध राहा-दक्ष रहा, असे आवाहन त्यांनी केले. 

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी भवनामध्ये मनोगत व्यक्त करताना मुश्रीफ कोल्हापुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले. मुश्रीफ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना मुस्लिम समाजाविषयी कधीच आकस नव्हता. मुस्लिम समाजाचीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर तितकीच गाढ श्रद्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार आणि इतर चाकरही होते. महाराजांच्या सैन्यदलाचा प्रमुख दौलतखान, महाराजांना जीवाला जीव देणारा आणि त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारा त्यांचा अत्यंत विश्वासू व खास अंगरक्षक मदारी मेहत्तर हे मुस्लिमच होते. तसेच, वकील काजी हैदर, सिद्धी हिलाल, शामाखान, नूरजहा बेगम असे 22 सरदार महाराजांकडे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एवढे प्रमुख मुस्लिम असतील तर त्या सैन्यात मुस्लिम मावळे किती असतील, याचीही प्रचिती येते. 75 वर्षांपूर्वी हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर भारतमाता हीच आमची आई आहे. या मातृत्वाच्या भावनेतूनच हिंदुस्तानी मुस्लिम समाज या मातीत राहीला. सामाजिक विद्वेषातून दंगे-धोपे आणि दंगली घडविणे हा काही लोकांचा अजेंडाच आहे. कोणत्याही बहकाव्यामध्ये येऊन या अजेंड्याला बळी पडू नका. मुस्लिम समाजाने आपल्या लहान, अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्या हातून अशा गोष्टी घडणार नाहीत, याचीही दक्षता घेतली पाहिजे.

किमान पाच जागा जिंकण्याची शपथ घेऊया

दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूर लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या किमान पाच जागा जिंकण्याची शपथ घेऊया.  1999 पासून जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कोल्हापूरची खासदारकीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आलेली आहे. या लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव असल्याचे मुश्रीफ म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget