(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hasan Mushrif : सभा कागलपूर्तीच मर्यादित आहे का? उद्या तुम्हीच पहा, नऊ मंत्री, लाखभर कार्यकर्ते सभेला उपस्थित राहणार; हसन मुश्रीफांचा दावा
नऊ मंत्री, लाखभर कार्यकर्ते सभेला उपस्थित राहणार आहेत, असा दावा केला. सभेसाठी अशी तयारी देशात प्रथम होत आहे. या सभेत 1 लाख लोक येतील. लोकांचा उत्स्फूर्त सहभाग असेल, असा दावा मुश्रीफ यांनी केला.
कोल्हापूर : अजित पवार गटाची उत्तर सभा उद्या रविवारी (10 सप्टेंबर) कोल्हापूरमध्ये होत आहे. या सभेसाठी अजित पवार गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तपोवन मैदानात होत असलेल्या सभेच्या ठिकाणी तयारीचा आढावा घेतला. उद्या होत असलेली सभा फक्त कागलसाठी मर्यादित आहे का? हे तुम्ही उद्याच पहा, नऊ मंत्री, लाखभर कार्यकर्ते सभेला उपस्थित राहणार आहेत, असा दावा केला. सभेसाठी अशी तयारी देशात प्रथम होत आहे. या सभेत 1 लाख लोक येतील. लोकांचा उत्स्फूर्त सहभाग असेल, असा दावा मुश्रीफ यांनी केला.
अजित पवारांचा जाहीर सत्कार आणि सभा
हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, उद्या उपमुख्यमंत्री अजित यांचा जाहीर सत्कार आणि सभा होणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आणि अस्वस्थता राहू नये, यासाठी सभेचे नियोजन करण्यात आले आहे. आम्ही पवार साहेबांचेच आहोत, त्यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो.
उत्तर सभेत शरद पवारांचा फोटो टाळला
अजित पवार गटाकडून सभेसाठी अनेक ठिकाणी कमान आणि कटआऊट्स लावण्यात आले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अद्यक्ष शरद पवार यांचा फोटो टाळण्यात आलेला नाही. स्वत: शरद पवार यांनीही फुटीर अजित पवार गटाला फोटो लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आले असता मुश्रीफ यांनी वरिष्ठांकडून पवार साहेबांचा फोटो वापरू नका, असं सांगण्यात आल्याचे सांगितले.
पालकमंत्रीपदावर मुश्रीफ म्हणाले...
कोल्हापूरचे पालकमंत्री बदलणार असल्याची चर्चा रंगली आहे. स्वत: विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कदाचित आपला हा शेवटचाच पालकमंत्री म्हणून दौरा असेल, असे स्पष्ट संकेत शुक्रवारी विविध विकासकामांचे उद्घाटन करताना दिले होते. त्यामुळे बदलाची चर्चा पुन्हा रंगली आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, तिन्ही पक्षाचे मंत्री-वरिष्ठ जे ठरवतील तेच होईल.
कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न दादा मार्गे लावतील
अजितदादांच्या कामावर तरुण वर्ग फिदा आहे. विकास आणि पक्षाच्या विस्तारासाठी अजित पवारांकडे पाहिले जाते. कामाचा माणूस म्हणूनच अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते, कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न दादा मार्गे लावतील. कोल्हापूरचे प्रश्न कसे मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या :