एक्स्प्लोर

Hasan Mushrif on Dhananjay Mahadik : जिल्हा बँक, गोकुळमध्ये मी सुद्धा आहे हे धनंजय महाडिकांनी विसरु नये, सत्तांतरावरून हसन मुश्रीफांचा खोचक टोला!

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याचे परिणाम जिल्हा बँक आणि गोकुळमध्येही त्याचे पडसाद उमटतील, असा दावा करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी खोचक टोला लगावला आहे.

Hasan Mushrif on Dhananjay Mahadik : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याचे परिणाम कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळमध्येही त्याचे पडसाद उमटतील, असा दावा करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी खोचक टोला लगावला आहे. ते सतेज पाटील यांना उद्देशून बोलले असावेत, पण मी सुद्धा त्यामध्ये आहे हे त्यांनी विसरू नये, असा टोला त्यांनी धनंजय महाडिक यांना लगावला. 

केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव असल्याचे मुश्रीफ म्हणाले. मुश्रीफ यांनी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात बोलताना सांगितले की, धनंजय महाडिक यांनी केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघाच्या सत्तेबाबत केलेला दावा मी वाचला आणि बघितला. त्यांनी कदाचित हा दावा आमदार सतेज पाटील यांना नजरेसमोर धरून केला असावा. या दोन्हीही संस्थांमध्ये हसन मुश्रीफ हासुद्धा एक घटक आहे, हे कदाचित ते विसरले असतील.

केडीसीसी बँक आणि गोकुळ या दोन्हीही ठिकाणी सत्ताबदल अजिबात होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जरी सत्ता बदल झाला, तरी ही सगळी माणसं आपल्या जिल्ह्यातील आहेत, कोणी परकी नाहीत. निवडून आलेल्या संचालकांसाठी अनेक सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी खस्ता खालेल्या आहेत. त्यामुळे कुणीही कार्यकर्ता आणि संचालक या सत्ताबदलाला अनुकूल नसणार असे त्यांनी नमूद केले.

महाडिकांना खासगीत पटवून सांगू

आमदार मुश्रीफ पुढे  म्हणाले की, धनंजय महाडिक आणि माझी खासगीत भेट झाली, तर मी त्यांना समजावून सांगेन. या दोन्ही संस्थांची आर्थिक प्रगती आणि सभासदाभिमुख कारभार, याबाबत त्यांना सांगेन. 

हसन मुश्रीफ गोकूळमधील कामगिरीवर बोलले

ते म्हणाले की, जिल्हा बँकेची सत्ता अनेक वर्ष आपल्याकडे आहे. मात्र, गोकुळची सत्ता वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे आली आहे. गोकुळच्या इतिहासात म्हशीच्या दुधाला लिटरला 6 रुपये आणि गाईच्या दुधाला लिटरला 5 रुपये इतकी उच्चांकी दूध दरवाढ केलेली आहे. वार्षिक तीन हजार रुपये कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल वाढलेली आहे. यापूर्वी दूध पावडर निर्मितीमध्ये गोकुळ दूध संघाला कधीच फायदा होत नव्हता. निव्वळ गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 12 कोटी रुपये फायदा हा दूध पावडर विक्रीमधून झाला आहे. 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur News: ऑपरेशन लोटस; जयकुमार गोरेंचा अकलूजकरांना दे धक्का, माने पाटील, माने देशमुख कुटुंबीय भाजपच्या वाटेवर, घडामोडींना वेग
ऑपरेशन लोटस; जयकुमार गोरेंचा अकलूजकरांना दे धक्का, माने पाटील, माने देशमुख कुटुंबीय भाजपच्या वाटेवर, घडामोडींना वेग
Beed Crime: बीडमध्ये मनी हाईस्ट, भिंत फोडून कॅनरा बँकेवर दरोडा, गॅस कटरने बँकेची तिजोरी फोडली
बीडमध्ये मनी हाईस्ट, भिंत फोडून कॅनरा बँकेवर दरोडा, गॅस कटरने बँकेची तिजोरी फोडली
Beed Crime: बीड हादरले! भावकीतील लोकं घरात घुसले, बापासह पोरांना बेदम मारहाण, मुलीला विष पाजलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार
बीड हादरले! भावकीतील लोकं घरात घुसले, बापासह पोरांना बेदम मारहाण, मुलीला विष पाजलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार
Kolhapur News: कोल्हापुरात महिलेशी वादातून भररस्त्यात कोयता नाचवला अन् पोलिसांनी तिथंच नेत गुडघ्यावर वाकवत मस्ती जिरवली
कोल्हापुरात महिलेशी वादातून भररस्त्यात कोयता नाचवला अन् पोलिसांनी तिथंच नेत गुडघ्यावर वाकवत मस्ती जिरवली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Viral Video: बुलढाण्याच्या खामगावमध्ये मद्यधुंद महिलेचा 'हाय व्होल्टेज ड्रामा', नागरिकांनी उचलून गाडीत बसवले
Doctor Suicide Case: 'त्या सरकारकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार?', Sushma Andhare यांचा सवाल
Beed Crime: किरकोळ कारणावरून हॉटेल कामगाराला अमानुष मारहाण, लोखंडी रॉडने पाय तोडला!
Crime News: 'पत्नीच्या गळ्याला चाकू लावला', Pathardi मधील लग्नघरात दरोडा, Baban Manjare कुटुंब हादरले
Farmers Protest: 'सरकारने आंदोलनावर डाव टाकला', Manoj Jarange यांचा Bacchu Kadu यांना पाठिंबा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News: ऑपरेशन लोटस; जयकुमार गोरेंचा अकलूजकरांना दे धक्का, माने पाटील, माने देशमुख कुटुंबीय भाजपच्या वाटेवर, घडामोडींना वेग
ऑपरेशन लोटस; जयकुमार गोरेंचा अकलूजकरांना दे धक्का, माने पाटील, माने देशमुख कुटुंबीय भाजपच्या वाटेवर, घडामोडींना वेग
Beed Crime: बीडमध्ये मनी हाईस्ट, भिंत फोडून कॅनरा बँकेवर दरोडा, गॅस कटरने बँकेची तिजोरी फोडली
बीडमध्ये मनी हाईस्ट, भिंत फोडून कॅनरा बँकेवर दरोडा, गॅस कटरने बँकेची तिजोरी फोडली
Beed Crime: बीड हादरले! भावकीतील लोकं घरात घुसले, बापासह पोरांना बेदम मारहाण, मुलीला विष पाजलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार
बीड हादरले! भावकीतील लोकं घरात घुसले, बापासह पोरांना बेदम मारहाण, मुलीला विष पाजलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार
Kolhapur News: कोल्हापुरात महिलेशी वादातून भररस्त्यात कोयता नाचवला अन् पोलिसांनी तिथंच नेत गुडघ्यावर वाकवत मस्ती जिरवली
कोल्हापुरात महिलेशी वादातून भररस्त्यात कोयता नाचवला अन् पोलिसांनी तिथंच नेत गुडघ्यावर वाकवत मस्ती जिरवली
IND vs AUS Semi Final Mumbai Weather : मुंबईतील पावसामुळे टीम इंडियाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगणार, ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमी फायनल ड्रॉ झाल्यास सगळं संपणार, काय आहे समीकरण?
मुंबईतील पावसामुळे टीम इंडियाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगणार, ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमी फायनल ड्रॉ झाल्यास सगळं संपणार, काय आहे समीकरण?
Bachchu Kadu: श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंचा फॉर्म्युला
श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंचा फॉर्म्युला
Pune Jain Boarding: गोखले बिल्डर्सने व्यवहार रद्द केला पण धंगेकर पिच्छा सोडेनात, जैन बोर्डिंग डीलप्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देणार
मला राजकारणात अजून कोणी मर्द भेटलाच नाही, थोडे दिवस द्या सगळ्यांची औकात काढतो: रवींद्र धंगेकर
Bacchu Kadu & Devendra Fadnavis: तुम्ही दिलेला शब्द आठवा, कर्जमाफी करुन तुमच्यावरील कलंक धुऊन टाका, बच्चू कडूंचे देवेंद्र फडणवीसांना आवाहन
देवेंद्र फडणवीस शेतकरी कर्जमाफी करा, तुमच्यावरील कलंक धुऊन टाका: बच्चू कडू
Embed widget