(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur District Gram Panchayat Election Result : गोल्डमॅनला घरी बसवला, भाजीवाला तसेच गावात 50 अल्पसंख्याक मते नसतानाही सरपंच ! कोल्हापूर जिल्ह्यातील यशाचे शिलेदार
Kolhapur District Gram Panchayat Election Result : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी कारभारी निश्चित झाले. काल आलेल्या निकालात ग्रामीण मतदारांनी प्रस्थापितांना चांगलाच हादरा दिल्याचे दिसले.
Kolhapur District Gram Panchayat Election Result : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी कारभारी निश्चित झाले. काल आलेल्या निकालात ग्रामीण मतदारांनी प्रस्थापितांना चांगलाच हादरा दिला. जिल्ह्यातील 198 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर घडून आले. थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने अनेक ठिकाणी चकित करणारे निकालही समोर आले. जिल्ह्यात (Kolhapur District Gram Panchayat Election Result ) कुठं पिग्मी एजंट, कुठं भाजीवाला, तर कुठं मोलकरणीने विजय मिळवून लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ केला.
महिलांचा मोर्चा गावकऱ्यांनी सार्थ ठरवला
करवीर तालुक्यातील म्हाळूंगे गावात सरपंचपदासाठी प्रकाश चौगले यांनी अर्ज दाखल करावा अन्यथा अन्नालाही शिवणार नाही, असा इशारा ठिय्या आंदोलन करून दिला होता. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. प्रकाश चौगले थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
Kolhapur District Gram Panchayat Election Result निष्ठावंत शिवसैनिक झाला सरंपच
शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे गावातील कट्टर शिवसैनिक असलेल्या आनंदा भोसलेचा प्रवास थक्क करणारा आहे. रुमबाॅयपासून ते भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या अनिल भोसलेनं थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्याची समाजाप्रती असलेली तळमळ त्याच्या कृतीतून नेहमीच दिसून आली आहे. त्याने पत्रकारितेचंही शिक्षण घेतलं आहे. मावळत्या ग्रामपंचायतीमध्ये तो सदस्य होता. आता थेट जनतेतून सरपंच झाला आहे.
पंचायतीच्या निवृत्त कर्मचाऱ्याच्या सुनेकडून विद्यमान सरपंचाच्या पत्नीचा पराभव
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पहिलान निकाल कागल तालुक्यातील बामणीतून आला होता. या गावातही एका लढतीची गावभर चर्चा होती. बामणी ग्रामंपचायतीच्या पाणीपुरवठा विभागातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या सुनेने गावात दोनवेळा सरपंच झालेल्या मुश्रीफ गटातील विद्यमान सरंपचाच्या पत्नीचा पराभव केला. पांडूरंग मगदूम यांच्या सून रेश्मा यांनी विद्यमान सरपंच रावसाहेब पाटील यांच्या पत्नी कमल पाटील यांचा पराभव केला.
Kolhapur District Gram Panchayat Election Result मोलकरीण झाली ग्रामपंचायत सदस्य
करवीर तालुक्यातील वडणगेत मोलकरीण ग्रामपंचायत सदस्य झाली आहे. वर्गणी काढून त्यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. पतीच्या अकाली मृत्यूनंतर त्यांनी धुणी भांडीचे काम सुरु केले होते. कोणतेही राजकीय पाठबळ नसताना त्यांना यश मिळाले.
हातकणंगले तालुक्यात लक्षवेधी विजय
हातकणंगले तालुक्यातील जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पुलाची शिरोलीत महाडिक गटाने 17 पैकी 16 जागांसह सत्तांतर घडवले. मात्र, सत्ताधारी शाहू आघाडीत एकमेव विजयी झालेले शक्ती यादव पिग्मी एजंट आहेत. हातकणंगले तालुक्यातील तळदंगेत ग्रामस्थांनी प्रस्थापितांना धक्का देत उच्चशिक्षित प्रा.संदीप पोळ यांना सरंपचपदी निवडून दिले आहे. दुसरीकडे रेंदाळमध्ये आरोग्यदूत म्हणून परिचित असेलल्या महेश कोरवी यांनीही लक्षवेधी विजय मिळवला. त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.
अल्पसंख्याक मते 50 पेक्षा कमी असूनही सरपंच
करवीर तालुक्यातील हिरवडे खालसा (ता.करवीर) थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत नदीम अल्ताफ मुजावर विजयी झाले. अल्पसंख्याक मते 50 पेक्षा कमी असूनही ते विजयी झाले. गावात जिव्हाळ्याचे संबंध आणि प्रत्येक कामात उपयोगी पडण्याच्या आणि प्रामाणिक हितसंबंधामुळे त्यांनी विजय मिळवला.
Kolhapur District Gram Panchayat Election Result गोल्डमॅन झाला पराभूत
दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक केलेल्या ए.एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीमधील गोल्डमॅनने ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, मतदारांनी त्याला घरचा रस्ता दाखवत झिडकारले.
इतर महत्वाच्या बातम्या