एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 'या' दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक उलथापालथ!

Kolhapur District Gram Panchayat Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या 429 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना तगडा हादरा देताना  उलथून टाकले आहे.

Kolhapur District Gram Panchayat Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या 429 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना तगडा हादरा देताना  उलथून टाकले आहे. जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांनी सर्वाधिक बाजी मारली असून तब्बल 198 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. जेवणावळीच्या पंगतीच्या पंगती उठवून आणि लाखोंची खिरापत वाटून सरपंचपद घेतले जात असतानाच सर्वसामान्य घरातील सरपंच होण्याची किमयाही या निवडणुकीतून घडली. त्यामुळे पंचायत निवडणुकीत संमिश्र निकालाची नोंद झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवातीपासून करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि कागल या चार तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींसाठी सर्वाधिक चुरस होती. या चार तालुक्यांमध्ये एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नव्हती. त्यामुळे या चार तालुक्यातील निकालांवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. करवीर आणि हातकणंगले या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक सत्तांतर घडून आले आहे. त्यामुळे या दोन तालुक्यात प्रस्थापितांना हादरा बसला आहे. करवीर तालुक्यात झालेल्या 53 पैकी तब्बल 29 गावांमध्ये सत्तांतर झाले आहे. 24 गावांमध्ये स्थानिक आघाडी विजयी झाली आहे. तालुक्यातून 4 सरपंच आणि 67 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले होते. दुसरीकडे हातकणंगले तालुक्यात 22 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर  झाले आहे. दरम्यान, करवीर तालुक्यातील 53 पैकी 31 ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस, 4 ग्रामपंचायतीमध्ये भाजप, चार ग्रामपंचायतींमध्ये नरके गट, 13 गावांमध्ये स्थानिक  आणि 2 ग्रामपंचायतीमध्ये सर्वपक्षीय आघाडी निवडून आली आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या 21 पैकी 18 ग्रामपंचायतींमध्ये सतेज पाटील, तर 3 ग्रामपंचायतीत महाडिक गटाची सत्ता आली आहे. 

Kolhapur District Gram Panchayat Election Result करवीर तालुक्यात या गावांमध्ये सत्तांतर 

करवीर तालुक्यातील वडणगे, हिरवडे खालसा, सादळे मादळे, वरणगे, हसूर दुमाला, सावर्डे दुमाला, सडोली दुमाला, हिरवडे दुमाला, गांधीनगर, वळीवडे, परिते, पासार्डे, कांडगाव, चिंचवडे तर्फ कळे, वाकरे, कंदलगाव, मांडरे,  कसबा बीड, दोनवडे, शेळकेवाडी, नेर्ली, भूये, सांगरूळ, आंबेवाडी, कणेरी या गावांमध्ये सत्तांतर झाले आहे.

हातकणंगले तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर 

करवीर तालुक्यानंतर जिल्ह्यात सर्वाधिक सत्तांतर हातकणंगले तालुक्यात झाले आहे. तालुक्यातील 39 पैकी 22 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर घडून आले आहे. तालुक्यात भाजपची सरशी झाली आहे. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पुलाची शिरोली ग्रामपंचायतीत महाडिक गटाने सतेज पाटील गटाला धक्का देताना सत्तांतर घडवले. सरपंचपदी महाडिक गटाने बाजी मारली. दरम्यान, 17 ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांना गावकऱ्यांनी कौल दिला आहे.

Kolhapur District Gram Panchayat Election Result या गावांमध्ये सत्तांतर 

भेंडवडे, चोकाक, चावरे, घुणकी, नरंदे, नागाव, जुने पारगाव, निलेवाडी, सावर्डे, कापूरवाडी, शिरोली, कासारवाडी, मौजे वडगाव, लक्ष्मीवाडी, हिंगणगाव, कोरोची, मजले, पट्टणकोडोली, रेंदाळ, साजणी, तारदाळ, तळदंगे या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. 

Kolhapur District Gram Panchayat Election Result अन्य तालुक्यातील काय स्थिती?

  • राधानगरी 58 पैकी 13 
  • पन्हाळा तालुक्यातील 40 पैकी 11 
  • शाहूवाडी तालुक्यात 43 पैकी 20 
  • गगनबावडा तालुक्यात 18 पैकी 3
  • कागल तालुक्यात 26 पैकी 15
  • शिरोळ तालुक्यात 17 पैकी 11 
  • गडहिंग्लज तालुक्यातील 30 पैकी 20 
  • चंदगड चंदगड तालुक्यातील 37 पैकी 20
  • आजरा तालुक्यातील 31 पैकी 14 
  • भुदरगड तालुक्यात 38 पैकी 20 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget