Kolhapur : अंथरुणात मण्यार सापाने घेतला चावा, तीन दिवसांपासून मृत्यूशी संघर्ष सुरु असलेल्या ओंकारची प्राणज्योत मालवली
तीन दिवसांपूर्वी अंथरुणात मण्यार जातीच्या सापाने चावा घेतल्याने मृत्यूशी संघर्ष करत असलेल्या ओंकार पांडूरंग भोपळे या अवघ्या 22 वर्षीय तरुणाची उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी अंथरुणात मण्यार जातीच्या सापाने चावा घेतल्याने मृत्यूशी संघर्ष करत असलेल्या ओंकार पांडूरंग भोपळे या अवघ्या 22 वर्षीय तरुणाची उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली. एकूलता एक असल्याने त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
गगनबावडा तालुक्यातील धुंदवडेपैकी चौधरीवाडीमध्ये ओंकारला मंगळवारी रात्री झोपल्यानंतर अंथरुणामध्ये मण्यार जातीच्या सापाने दंश केला. त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खासगी रुग्णालयामध्ये त्याचा संघर्ष सुरु होता. डाॅक्टरांकडून त्याला वाचवण्यासाठी शर्थीची झुंज दिली, पण त्याला वाचवण्यात अपयश आले. एकूलत्या एक मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्याने आई वडिलांनी फोडलेल्या हंबरड्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. ओंकारच्या पश्चात आई, वडील आणि दोन बहिणी असा आहे. ओंकार धुंदवडेत चिकन आणि मटणाचे दुकान चालवून उदरनिर्वाह करत होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur News : पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यानं करून दाखवलं! हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक पदाचा मान
- Kolhapur Nagarpalika Election 2022 : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिकांना थेट जनतेतून नगराध्यक्ष मिळणार
- Satej Patil on Sanjay Mandlik : सतेज पाटील म्हणाले, खासदार संजय मंडलिकांनी घेतलेला निर्णय दुःख देणारा, पण जिल्ह्याच्या राजकारणात..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
