(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satej Patil on Sanjay Mandlik : सतेज पाटील म्हणाले, खासदार संजय मंडलिकांनी घेतलेला निर्णय दुःख देणारा, पण जिल्ह्याच्या राजकारणात..
2019 मध्ये स्वतःची रसद पुरवून संजय मंडलिक यांना विजयी गुलाल लावलेल्या आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्या बंडखोरीवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी घेतलेला निर्णय दुख:द असल्याचे ते म्हणाले.
Satej Patil on Sanjay Mandlik : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केलेल्या बंडखोरीमुळे जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. 2019 मध्ये स्वतःची रसद पुरवून संजय मंडलिक यांना विजयी गुलाल लावलेल्या आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्या बंडखोरीवर नाराजी व्यक्त केली आहे.
संजय मंडलिक यांच्या बंडखोरीनंतर सतेज पाटील यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले. या दरम्यान ते बोलताना म्हणाले की, संजय मंडलिक दिल्लीला जाताना भेटून गेले त्यावेळी आम्ही त्यांना जाऊ नका अशी विनंती केली होती. मात्र, ते जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्या सोबत राहतील अशी आशा आहे. संजय मंडलिक यांनी हा घेतलेला निर्णय दुख:द असल्याचे ते म्हणाले. सहकारामधील प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही एकत्र आलो होतो असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान त्यांनी शिवसेनेमधील बंडखोरीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, 40 आमदार आणि 12 खासदारांना घेऊन काय मिळणार? हा प्रश्न आहेच. त्यामुळे यामागे काय कारणे आहेत हे येत्या दोन महिन्यात बाहेर येतील. देशांमध्ये आजवर असं कधी सुडाचे राजकारण झालं होत नव्हतं असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, त्यांनी विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने भारत जोडो अभियान सुरू केल्यानंतर लगेच कारवाई करण्यात आली. अशा दबावाला काँग्रेस कधीच बळी पडणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
राज्याला किमान मदत आणि पुनर्वसन मंत्री राज्याला द्या
राज्यात शिंदे सरकारचा अजूनही विस्तार झालेला नाही. यावरून त्यांनी टीकास्त्र सोडले. राज्याला किमान मदत आणि पुनर्वसन मंत्री मिळायला हवा. सरकार संकट काळात खोटे मदत करते असं दिसत नाही. सरकार नंतर केवळ पंचनामे पाहायला येणार आहे का? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur Crime : कोल्हापूरच्या अवघ्या दहावी पास रियाजने आमदारांना मंत्रिपदासाठी 100 कोटींचा चुना लावण्याचा बेत रचला!
- Hasan Mushrif : वेळ आल्यास लोकसभेला शड्डू ठोकणार का? विचारताच हसन मुश्रीफ काय म्हणाले?
- Dhairyashil Mane : जिथं सत्ता तिथं राजकीय निष्ठा! खासदार धैर्यशील मानेंच्या राजकीय प्रवासाचा थाटच न्यारा
- Sanjay Mandlik : बंटी पाटलांच्या ताकदीने विजयी गुलाल उधळला अन् आता शिंदे गटात, जाणून घ्या खासदार संजय मंडलिकांची राजकीय कारकिर्द
- Sanjay Pawar : कोल्हापूरच्या दोन्ही शिवसेना खासदारांची बंडखोरी, जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अश्रू अनावर