एक्स्प्लोर

Kolhapur Nagarpalika Election 2022 : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिकांना थेट जनतेतून नगराध्यक्ष मिळणार

Kolhapur Nagarpalika Election 2022 : राज्यातील 92 नगरपरिषदा, 4 नगर पंचायतीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Kolhapur Nagarpalika Election 2022 :  ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घोषित करण्यात आलेल्या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली होती. आता पुढे ढकलण्यात आलेल्या नगरपरिषदांमध्येही थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक होणार आहे. राज्यातील 92 नगरपरिषदा, 4 नगर पंचायतीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.

त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांना थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाईल. निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आलेल्या नगरपालिकांमध्ये जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड आणि कुरूंदवाड या 6 नगरपालिकांचा समावेश आहे. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने लवकरच या निवडणूक होतील अशी चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर निर्णय देताना निवडणूका दोन आठवड्यात घेण्यास सांगितले होते. 

शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारचा निर्णय फिरवताना पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीबाबत मोठा निर्णय घेतला. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शिवाय  ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. 

शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या निर्णयांना केराची टोपली दाखवण्याचा सपाटा सुरुच आहे. ठाकरे सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय शिंदे सरकारकडून बदलला जात आहे. 

तत्कालिन फडणवीस सरकारकडून थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे निर्णय बदलण्यात आले. नगरपरिषद, नगरपंचायतीमधील सदस्य विरोधी पक्षांचे आणि नगराध्यक्ष इतर पक्षांचा असल्यामुळे विकासकामांबाबत निर्णय घेण्यात अडचणी येत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर थेट निवडणूक रद्द करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा राज्यात थेट पद्धतीनं नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, नेमकं काय घडलं?
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, नेमकं काय घडलं?
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Embed widget