पी. एन. पाटील : "काँग्रेसच्या काळात उभारलेल्या लॅबमध्ये कोरोना लस निर्माण झाली, आणि त्यावर पंतप्रधान फोटो लावतात"
पी. एन. पाटील यांच्याकडून कोल्हापूरमध्ये गेल्या 29 वर्षांपासून सद्भावना रॅली आयोजित केली जाते. आजच्या रॅलीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते. पाटील यांनी यावेळी भाजपवर कडाडून प्रहार केला.

P N Patil : या देशात टाचणीदेखील तयार होत नव्हती, अशा काळात काँग्रेसने देशाचं नेतृत्व केलं आहे. आता देशात अत्याधुनिक विमान बनवू शकतो, हे काँग्रेसनं करून दाखवलं असल्याचा टोला काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांनी भाजप आणि पीएम मोदी यांना लगावला.
पी. एन. पाटील यांच्याकडून गेल्या 29 वर्षांपासून अव्याहतपणे सद्भावना रॅली आयोजित केली जाते. आज झालेल्या रॅलीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते. पी. एन. पाटील यांनी यावेळी बोलताना भाजपवर कडाडून प्रहार केला.
ते पुढे म्हणाले की, संगणक म्हणजे काय हे माहिती नसणाऱ्यांनी संगणकला विरोध केला. देशातील सर्व संस्था विकल्या जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान म्हणतात, की फकीर आदमी झोळी घेऊन जाऊ शकतो. म्हणजेच देश संकटात सापडला, की हे झोळी घेऊन जातील.
मोदींच्या झोळींच्या वक्तव्यावरून बोलताना पाटील पुढे म्हणाले की, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे बोलले होते की, रक्ताचा एक न एक थेंब देशासाठी असेल.काँग्रेसने उभा केलेल्या लॅब मध्ये कोरोनाची लस निर्माण झाली आहे, आणि त्यावर पंतप्रधान फोटो लावतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
देशात कधी नव्हती इतकी बेरोजगारी निर्माण झाली आहे
त्यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीवरूनही मोदी सरकारला लक्ष्य केलं. देशात कधी नव्हती इतकी बेरोजगारी निर्माण झाल्याचे ते म्हणाले. मोदी आणि अमित शाह हे अदानी आणि अंबानी यांना देश विकून मोकळे होतील असे ते म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
