एक्स्प्लोर

Balasaheb Thorat : "भारत सध्या कठीण परिस्थितीतून जातोय, आम्ही इंग्रजांविरोधात लढलो आहोत, घाबरणार नाही यांच्याविरोधात देखील आम्ही लढू"

आम्ही इंग्रजांविरोधात लढलो आहोत, त्यामुळे आम्ही घाबरणार नाही, यांच्याविरोधात देखील लढत राहू, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरमध्ये सद्भावना रॅलीमध्ये बोलताना केला.

Balasaheb Thorat : भारत सध्या कठिण काळातून जात आहे. मात्र, आम्ही इंग्रजांविरोधात लढलो आहोत, त्यामुळे आम्ही घाबरणार नाही, यांच्याविरोधात देखील लढत राहू, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरमध्ये सद्भावना रॅलीमध्ये बोलताना केला. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला.

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं त्याची इतिहासात नोंद होईल

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं त्याची इतिहासात नोंद होईल, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारने खूप चांगल्या पद्धतीने काम केल्याचेही ते म्हणाले. आजारपणामुळे काही करू शकले नाहीत म्हणून असा उल्लेख करणं चुकीचं असल्याचे त्यांनी सांगितले. 

महागाई वाढली की धर्माच्या नावाने राजकारण

बाळासाहेब थोरात म्हणाले की देशात महागाई वाढली की, धर्माच्या नावाने राजकारण केले जाते. त्यामुळे देश सध्या कठिण काळातून जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडोची मोहीम सुरु आहे. त्यामुळे आम्ही यांच्याविरोधात लढत राहू, असे थोरात म्हणाले. 

कोल्हापूरकरांनी सांगितलं की मला उपस्थित रहावं लागतं 

यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापूरच्या काँग्रेसच्या नेतृत्वाचे कौतूक करताना कोल्हापूरकरांनी सांगितलं की, मला उपस्थित राहावं लागत. मला सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्हा आवडतो. काँग्रेसकडून पी. एन. पाटील यांचे आभार मानतो. कारण  गेली 29 वर्षे ही सद्भावना दौड कायम ठेवणं सोप्प नाही. आयुष्यात चढ उतार हे असतात, पण आपल्या विचाराशी कायम राहणं गरजेचं असतं, आमचा विचार हा शाश्वत विचार असल्याचे थोरात म्हणाले. 

काँग्रेसला ताकद देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरचं नाव घ्यावं लागतं

महात्मा गांधी यांनी जो अहिंसेचा विचार दिला, त्यामुळे देशात लोकशाही टिकली आहे. काँग्रेसला ताकद देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरचं नाव घ्यावं लागतं. संपूर्ण देशात छत्रपती शाहू महाराज यांचे नाव घेतलं जातं, तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम केलं जातं.  

ज्या तंत्रज्ञानाला विरोध केला त्याचाच वापर करून हे सत्तेवर आले 

बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारच्या कारभारावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, 8 वर्षात एनडीए सरकारने काय केलं याचं उत्तर त्यांनी द्यावे. 2024 ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून काम केलं जातं. महागाई वाढली की धर्माच्या नावाने राजकारण केलं जातं. भारत सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, ज्यांनी तंत्रज्ञानाला विरोध केला, तेच त्याचाच वापर करून सत्तेत आल्याचा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला. 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget