Kolhapur News : काँग्रेस आमदारांची क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्कमध्ये 25 एकर जागा देण्याची राज्य सरकारकडे मागणी
Kolhapur News : शेंडा पार्क येथील 25 एकर जागा प्रस्तावित क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापुरातील काँग्रेस आमदारांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यामार्फत राज्य सरकारला पत्र दिले आहे.
Kolhapur News : शेंडा पार्क येथील 25 एकर जागा प्रस्तावित क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापुरातील काँग्रेस आमदारांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यामार्फत राज्य सरकारला पत्र दिले आहे. काँग्रेस आमदार माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव आणि ऋतुराज पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मागणीचे निवेदन दिले. राज्य सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक जिल्ह्यात एक असे राज्याने भव्य क्रीडा संकुल विकसित करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला खेळाची समृद्ध परंपरा असून जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. तथापि, त्यापैकी बहुतेक पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात किंवा परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली परदेशात प्रशिक्षण घेतात. ऋतुराज पाटील म्हणाले की, क्रीडा संकुलाचा आराखडा जवळपास तयार झाला आहे. कोल्हापुरात इनडोअर आणि आऊटडोअर स्टेडियम, स्पोर्ट्स हॉस्टेल आणि म्युझियम विकसित केले जातील.
कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलास शासनाकडून मान्यता मिळाली आहे. शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी क्रीडा संकुल निर्मितीची योजना कार्यान्वित केली. मात्र, जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रश्न जागा उपलब्ध नसल्याने रखडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जिल्हा क्रीडा संकुल निर्मितीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. नियोजित स्थळाला अनेकदा भेट देऊन, तसेच अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन आमदार पाटील यांनी क्रीडा संकुलाच्या रूपरेषेचा आराखडा तयार करण्यात पुढाकार घेतला आहे. मात्र, शासनाकडून ही जागा ताब्यात मिळाली नसल्याने जिल्हा क्रीडा संकुलचा विषय रखडला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या