एक्स्प्लोर

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांविरोधात आणखी 25 शेतकऱ्यांची तक्रार; प्रकरणाचा तपास कोल्हापूर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग करणार

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल झालेला गुन्हा आणि तक्रारींचा तपास कोल्हापूर आर्थिक गुन्हे अन्वेषणकडून करण्यात येणार आहे. 

Hasan Mushrif : माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आणखी 25 शेतकऱ्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा आणि तक्रारींचा तपास कोल्हापूर आर्थिक गुन्हे अन्वेषणकडून करण्यात येणार आहे. 

संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी आणि इतर लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. 40 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्रीफ यांनी 2012 मध्ये कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक होण्याचे आवाहन केले होते. त्यातून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर भांडवल घेतले आणि सुमारे 40 कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

फसवणुकीच्या गुन्ह्यात दिलासा 

दरम्यान, ईडीच्या छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत. मुरगूडमध्ये दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

दुसरीकडे हसन मुश्रीफांवर सातत्याने आरोप केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने तगडा झटका दिला आहे. याप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा खडा सवाल न्यायालयाने केला. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी 

दरम्यान, मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर आतापर्यंत तीनवेळा चौकशी झाली आहे. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं दिलं असून या चौकशीमध्ये आपण त्यांना सहकार्य करत असल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ईडीकडून गेल्या दोन महिन्यांत त्यांच्यावर तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. ईडीने चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणीNana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणारGopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्लाSadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Embed widget