Kolhapur News : याचं 'थेट' क्रेडिट कोण कोण घेणार की सर्वपक्षीय नेते, कृती समिती बिंदू चौकात येऊन ठरवणार?
कोल्हापूर शहरातील भूमिगत पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कधी फुटून रस्त्यावर तळी निर्माण करेल, याचा अंदाज नसतानाच आता ड्रेनेज सुद्धा त्याच मार्गावर आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात (Kolhapur News) नागरी समस्यांची स्थिती पाहिल्यास एक ना धढ भाराभर चिंध्या अशी झाली आहे. कोल्हापूर शहर खड्ड्यात (Kolhapur Civic Issues) असल्याने दररोज शहरवासियांना त्रास सुरु असतानाच तुंबलेली ड्रेनेज सुद्धा भीषण अवस्थेत आहेत. कोल्हापूर शहरातील भूमिगत पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कधी फुटून रस्त्यावर तळी निर्माण करेल, याचा अंदाज नसतानाच आता ड्रेनेज सुद्धा त्याच मार्गावर आहेत. त्यामुळे जाब नेमका कोणाला विचारायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूर मनपाची मुदत तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कारभार सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरच बेवारस स्थितीत गेलं आहे.
ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
कोल्हापूर शहरात मंगळवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या रस्त्यांवरील गुडघाबर खड्ड्यात पाणी तुंबून सर्वत्र तळी निर्माण झाली होती. यामधून वाट काढताना वाहनधारकांची कसरत सुरु असतानाच बिग बझार रोडवर एकाच लाईनमध्ये दोन ड्रेनेज फुटून रस्त्यावर वाहू लागली होती. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी रोडवून पार्वती टाॅकिजच्या सिग्नलच्या चौकातून वाहत जात होते. शहरात अनेक ठिकाणी दोन दोन फूट वर आलेली ड्रेनेज झाकण सुद्धा अपघातास निमंत्रण देणारी आहेत. पाणीपुरवठा विभागात कर्मचारी कमी आणि गळती त्यांच्यापेक्षा जास्त अशी स्थिती आहे.
रस्त्यांची झाली चाळण
कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून 100 कोटी रुपयांच्या रस्त्याची चर्चा होऊनही अजून नारळ फुटलेला नाही. पावसाळा संपून दोन महिन्यानंतरही रस्त्यांची पार चाळण होऊनही पॅचवर्क हाती घेण्यात आलेलं नाही. मोजक्या रस्त्यांचा अपवाद सोडल्यास एकही रस्त्या नाही, जिथं जीवघेणा खड्डा नाही. 100 कोटींचे काम सुरु होत नसल्याने 16 कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, त्यावरही कार्यवाही झालेली नाही.
कचऱ्याची भीषण अवस्था
जी स्थिती रस्त्यांची आहे ती शहरातील कचऱ्याची झाली आहे. कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून जशा मुताऱ्या गायब होत आहेत, तशा कचरा कुंड्याही गायब होत आहेत. त्यामुळे कचरा दिसेल त्या मोकळ्या जागेत आणि नसल्यास थेट रस्त्यावर अशा स्थितीत आहे. कचरापूर होण्यामध्ये बेजबादार नागरिकांनी सुद्धा तितकाच हातभार लावला आहे. आज (29 नोव्हेंबर) कोल्हापूर शहरातील कचऱ्याच्या प्रश्नी काँग्रेसकडून दवंडी पेटवून तीव्र आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निष्क्रिय प्रशासनाला जाग येण्यासाठी माजी नगरसेवकांकडून आंदोलन करण्यात आले.
हॉकी स्टेडियम-कळंबा जेल रस्त्यासाठी आपचा रस्ता रोको
दुसरीकडे, हॉकी स्टेडियम ते कळंबा जेल हा शहरातील नागरिकांना, विशेषतः शहरात येणाऱ्या चाकरमन्यांसाठी महत्वाचा रस्ता आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून हा रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. आप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून रस्ता रोको केला. तब्ब्ल एक तास आंदोलन सुरु राहिल्याने वाहतूक ठप्प झाली. अखेर टीपी कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता मयुरी पटवेगार यांनी आंदोलनस्थळी येऊन सहाय्यक रचनाकार विनय झगडे यांच्या बरोबर बैठकीचे निमंत्रण दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या