एक्स्प्लोर

Kumbhi Sakhar Karkhana Election : कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी चंद्रदीप नरकेंची बिनविरोध निवड; उपाध्यक्षपदी विश्वास पाटील-कोगेकरांची निवड

कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या  (Kumbhi Sakhar Karkhana Election) अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रदीप नरके व उपाध्यक्षपदी विश्वास पाटील-कोगेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Kumbhi Sakhar Karkhana Election : नुकत्याच पार पडलेल्या कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या  (Kumbhi Sakhar Karkhana Election) अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रदीप नरके व उपाध्यक्षपदी विश्वास पाटील-कोगेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी, चार पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सभासदांनी विश्वास दाखवल्यानेच संपूर्ण पॅनेल निवडून आल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सभासद, कर्मचारी, तोडणी वाहतूकदारांचे आभार मानले.

अध्यक्षपदासाठी चंद्रदीप नरके यांचे नाव संचालक अनिल पाटील यांनी सुचविले. पी. डी. पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी विश्वास पाटील यांचे नाव संचालक अनिष पाटील यांनी सुचविले. त्यास संजय पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक किशोर पाटील, उत्तम वरुटे, अनिल पाटील, विलास पाटील, राहुल खाडे, धनश्री पाटील, सर्व संचालक, कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर उपाध्यक्ष पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

चंद्रदीप नरकेंची चौथ्यांदा एकहाती सत्ता

दुसरीकडे, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या रणांगणात विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी चौथ्यांदा बाजी मारली आहे. सत्ताधारी नरके गटाने सर्व 23 जागांवर विजय मिळवत हुकूमत राखली. 15 वर्षांच्या सलग सत्तेनंतर नरके यांना सभासदांनी पुन्हा पाच वर्षांसाठी संधी दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलने सर्वच्या सर्व 23 जागांवर विजय मिळवला. 

कुंभीसाठी माजी आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध आमदार पी. एन. पाटील समर्थकांमध्ये होता. आजी-माजी आमदारांमध्ये थेट लढत होत असल्याने विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो चर्चेचा होता. नरके यांना आमदार सतेज पाटील यांची, तर आमददार पी. एन. पाटील यांना आमदार विनय कोरे यांचे पाठबळ होते. 

मतमोजणीत विरोधी पॅनेलला करवीर तालुक्यासह एकूण 35 गावांमध्ये पहिल्या फेरी सरासरी साडेतीनशे ते चारशे मतांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या फेरीत आमदार विनय कोरे आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या मदतीने विरोधकांना पुन्हा पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात अशाच पद्धतीने आघाडी मिळवता येईल हा विरोधकांचा अंदाज खोडून काढत सत्ताधारी तब्बल 450 ते 600 मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली. त्यामुळे शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात आमदार विनय कोरे आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांचा प्रभाव दिसला नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 29 December 2024Anandache Paan : लेखक Sudhir Rasal यांच्याशी 'Vindanche Gadyaroop' पुस्तकानिमित्त खास गप्पा 29 DecChenab Rail Bridge : आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल; चिनाब रेल्वे पुलाची संपूर्ण कहाणी Special ReportABP Majha Headlines : 02 PM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
Mumbai : मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
Embed widget