(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News: कोल्हापूर बाजार समिती सभापतीपदी काँग्रेसचे भारत पाटील; उपसभापतीपदी जनसुराज्यचे शंकर पाटील
भारत पाटील हे काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे समर्थक आहेत, तर शंकर पाटील आमदार विनय कोरे समर्थक आहेत. जिल्हा दुग्ध उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
Kolhapur News: कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (kolhapur bajar samiti election) सभापतीपदी भारत बाबासाहेब पाटील भुयेकर यांची निवड करण्यात आली आहे. उपसभापतीपदी शंकर बाबासो पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत पाटील हे काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे समर्थक आहेत, तर शंकर पाटील आमदार विनय कोरे समर्थक आहेत. जिल्हा दुग्ध उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी निवडणून निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. बाजार समितीच्या सभागृहामध्ये निवड प्रक्रिया पार पडली. नव्या सभापतींची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.
अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये निवडीची प्रक्रिया
संचालक प्रकाश देसाई बाबासाहेब पाटील यांचे नाव सुचवले, त्याला शिवाजीराव पाटील यांनी अनुमोदन दिले. शंकर पाटील यांचे नाव सुर्यकातं पाटील यांनी सुचवले तर शेखर देसाई यांनी अनुमोदन दिले. दोघांच्या नावावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आज त्याची औपचारिकता पार पाडण्यात आली. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये निवडीची प्रक्रिया झाली. सभापती निवड प्रक्रिया होण्यापूर्वी शासकीय विश्रामगृहावर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, युवराज पाटील, भैय्या माने तसेच गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शशिकांत खोत यांच्यामध्ये बैठक पार पडली. दोन्ही सभापतींच्या नावावर बुधवारी नेत्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
कोल्हापूर बाजार समितीमध्ये सत्ताधाऱ्यांची बाजी
दरम्यान, नुकत्याच झालेल्या कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत (kolhapur bajar samiti election) सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीमध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने बाजी मारली होती. राजर्षी शाहू शेतकरी विकास सत्तारूढ आघाडीने 18 पैकी 16 जागांवर विजय मिळवत विरोधी आघाडीचा धुव्वा उडवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस 6, काँग्रेस 4, जनसुराज्य 3, शिवसेना शिंदे गट 2, ठाकरे गट 1 जागा मिळाली. विरोधी शिव शाहू परिवर्तन शेतकरी विकास आघाडीला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला. विरोधी आघाडीतून व्यापारी अडते गटात नंदकुमार वळंजू यांनी विजय मिळवत शिव-शाहू परिवर्तन आघाडीचे खाते उघडले. हमाल मापाडी गटातून अपक्ष बाबूराव खोत विजयी झाले.
या निवडणूक प्रक्रियेत सर्वपक्षीय नेत्यांना मतदारांनी चिट्टीतून चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. इतकेच नव्हे, तर एका स्वाभिमानी मतदाराने पैसै करण्याचाही प्रकार समोर आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या