एक्स्प्लोर

Deepak Kesarkar on kolhapur Dasara : कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात पहिल्यांदाच शासनाचा सहभाग, शाहू महाराजांच्या परवानगीने दीपक केसरकरांची घोषणा

कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या शाही दसऱ्यामध्ये पहिल्यांदाच शासनाचा सक्रिय सहभाग असणार आहे. यासाठी शाहू महाराजांची परवानगी दिली असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Deepak Kesarkar on kolhapur Dasara : ऐतिहासिक परंपरा आणि कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या शाही दसऱ्यामध्ये पहिल्यांदाच शासनाचा सक्रिय सहभाग असणार आहे. यासाठी शाहू महाराजांची परवानगी दिली असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या शाही दसऱ्यासाठी 25 लाख निधी दिला जाणार असल्याची घोषणाही केसरकर यांनी यावेळी केली. 

यंदाचा ऐतिहासिक शाही दसरा कसा असेल याबाबत दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर तसेच मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर म्हणाले, यंदाचा शाही दसऱ्याचा सोहळा 2 दिवस चालणार आहे. पुढील वर्षीपासून कोल्हापूरचा दसरा तीन दिवस चालेल. 

ते  पुढे म्हणाले, दसऱ्यासाठी शाहू पॅलेस ते दसरा चौक ठिकठिकाणी प्रदर्शन भरवणार येईल. या माध्यमातून महिलांना रोजगार निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुढील वर्षीचा कोल्हापूरचा शाही दसरा राज्यस्तरीय व्हावा यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

अंबाबाई पालखी आणि छत्रपती शाहू महाराजांवर हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी  

दीपक केसरकर यांनी यावेळी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 25 लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा केली. ते म्हणाले की, या निधीसह आम्ही प्रायोजकही शोधत आहोत. हा लोकांचा सण असल्याने हा लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा आहे. शासनाचा सहभाग असला, तरी परंपरेमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, अशी ग्वाही दिली.  

अंबाबाईची पालखी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा विचार सुरु आहे. यासाठी पुण्याहून हेलिकाॅप्टर भाड्याने घेण्यासाठी उद्योगपती संजय घोडावत यांच्याशी चर्चा झाली आहे. पुढील वर्षी हा राज्याचा सोहळा असावा यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवणार आहे. या संदर्भातील घोषणा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील. या निमित्ताने शाहू महाराजांचे विचार लोकांसमोर येतील, असेही केसरकर यांनी सांगितले. 

दरम्यान, शाही दसरा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा होण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत तसेच  समाजातील सर्व घटकांच्या सहभागासाठीचे नियोजन, विविध सांस्कृतिक व अन्य उपक्रमांची रुपरेषा, महोत्सवाची  व्यापक प्रसिध्दी, आकर्षक विद्युत रोषणाई, ऐतिहासिक ठिकाणांचे व मिरवणूक मार्गांचे सुशोभिकरण, नागरिक व पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती काल झालेल्या बैठकीत दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget