एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur-Ratnagiri National Highway : नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी देवस्थानच्या इनाम जमिनी संपादीत; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन 

देवस्थान इनाम जमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान मोर्चातर्फे येत्या 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Nagpur-Ratnagiri National Highway : देवस्थान इनाम जमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान मोर्चातर्फे येत्या 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून शेतकरी आंदोलनास बसणार आहेत. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी देवस्थान इनाम जमीनी संपादीत केल्या आहेत त्याचा मोबदला राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार द्यावा, 50 टक्के रक्कम वहिवाटदार शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आहे. यापूर्वी ही या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांसमावेत चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही. वास्तविक 1947 च्या पूर्वीपासून शेतकरी जमीनी कसत होते.7/12 कब्जेदार व इतर हक्कात त्याची नावेही आहेत. 

भूसंपादनासाठीच्या निवाडा नोटीसही याच शेतकऱ्यांच्या नावे आल्या आहेत. त्यानुसार इनाम जमीनी कसनाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहीजे अशी आग्रही मागणी या आंदोलनातून मांडली जाणार आहे, अशी माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उदय नारकर, नारायण गायकवाड, चंद्रकांत कुरणे, संभाजी मोहिते, आप्पा परिट आदीनी दिली आहे.

दरम्यान, रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी (Nagpur-Ratnagiri National Highway) भूसंपादन करण्यात आले आहे. हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर आणि हातकणंगले अशा चार तालुक्यातील गावांमधून जाणार आहे. त्यामुळे महामार्गासाठी आंबा ते चोकाकपर्यंत जमीन संपादनाचे कामकाज सुरु आहे. 

यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या आखत्यारीतील 132 मंदिरांशी 325 गुंठे जमीन सुध्दा संपादित होणार आहे. त्यासाठी देवस्थान समितीने भूसंपादन विभागाला पत्र पाठवून नुकसान भरपाई मागितली आहे. ही रक्कम 15 कोटी 79 लाख रुपये आहे. ही रक्कम आता कसणाऱ्या शेतकऱ्याला द्यायची की देवस्थान समितीला असा प्रश्न निर्माण झाला आहे.  समितीने भूसंपादन विभागाला पत्र पाठवून नुकसान भरपाई मागितली आहे. समितीची शेकडो एकर जमिनी असल्या तरी त्या लागणदार व वहिवाटदारांकडे आहेत. देवस्थानाला कुळ कायदा लागू होत नाही. त्यामुळे दोघांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे आता तोडगा काढावा लागणार आहे. 

कोल्हापुरातील जोतिबा देवस्थानच्या जमिनी परस्पर विकल्याची भीती 

दुसरीकडे, दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थानच्या जमिनीची परस्पर विक्री (Sale of Shree Jyotiba Devasthan land) केल्याची माहिती नव्या वर्षाच्या सुरुवातीला समोर आली होती. सातारा, गोवा व कर्नाटक राज्यात असणारी चारशे एकर जमिनीपैकी 200 ते 250 एकर जमिनीची परस्पर व्रिकी झाल्याचे समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अशा जमिनीचा शोध घेऊन या जमिनी जोतिबा मंदिराच्या ताब्यात घेणार आहेत. तहसिलदारांना जमिनीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget