Kolhapur News: कोल्हापुरात एसटी आगाराच्या महिला वाहकाचा विनयभंग केल्याचा आरोप; कर्तव्यावर असताना घडला धक्कादायक प्रकार
एसटी कर्मचाऱ्यांनी या गंभीर कृत्याचा काळ्याफिती लावून निषेध केला प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. अधिकाऱ्यांनी मारहाण विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केलाचा देखील आरोप महिला वाहकानी केला.

Allegation of molestation of female conductor: कोल्हापुरातील कागल एसटी आगाराच्या महिला वाहकाचा तिकीट तपासणी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी विनयभंग (Allegation of molestation of female conductor) केल्याचा आरोप होत आहे. दिवसापूर्वी कागल इचलकरंजी मार्गावरील एसटीमध्ये कर्तव्यावर असताना हा प्रकार घडल्याचा दावा केला जातो. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने आज कोल्हापुरातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले. महिला वाहकाचा विनयभंग करणाऱ्या एसटी अधिकाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज एसटी कष्टकरी जनसंघाने निदर्शने केली.
एसटी विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलन
एसटी कष्टकरी जनसंघाने कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असलेल्या एसटी विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. एसटी कर्मचाऱ्यांनी या गंभीर कृत्याचा काळ्याफिती लावून निषेध केला प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. अधिकाऱ्यांनी मारहाण विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केलाचा देखील आरोप महिला वाहकानी केला. विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळेस एसटी कष्टकरी जनसंघाने दिला.
तरुणीचा आंतरधर्मीय प्रेमविवाह, मौलवीस मुलीच्या नातेवाइकांची मारहाण
दरम्यान, आणखी एका घटनेत (19 जून) रजिस्टर कार्यालयात साक्षीदार म्हणून उपस्थित राहिलेल्या मौलवीस मुलीच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याची घटना घडली. जयसिंगपूर येथील तरुण आणि आटपाडी (जि. सांगली) येथील तरुणीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केला. त्या विवाहासाठी रजिस्टर कार्यालयात साक्षीदार म्हणून उपस्थित राहिलेल्या मौलवीस मुलीच्या नातेवाइकांनी मारहाण केली. शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळ घडला. यावेळी तरुणांची गर्दी झाल्याने परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आटपाडी येथील तरुणी आणि जयसिंगपूर येथील तरुणाने 15 दिवसांपूर्वी कोल्हापुरात रजिस्टर लग्न केले. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. लग्नासाठी कोल्हापुरातील एक मौलवी साक्षीदार होते, अशी माहिती तरुणीच्या नातेवाइकांना मिळाली होती.
त्यानुसार तरुणीचा भाऊ काही तरुणांसह शुक्रवार पेठेतील मौलवीच्या घरी पोहोचला. त्याने जाब विचारत मौलवीस मारहाण केली. 112 कॉलवरून याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मौलवीस ताब्यात घेतले. चौकशीअंती संबंधित लग्न सहमतीने झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सोडून दिले.
इतर महत्वाच्या बातम्या

























