एक्स्प्लोर

प्रेमासाठी काय पण...! प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने घरातच मारला डल्ला; आईच्या 11 तोळे दागिन्यांसह दीड लाखांची चोरी, पण...

Chhatrapati Sambhajinagar : कर्जबाजारी प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने आपल्या आईचे दागिने दिल्याचे समोर आलं आहे. तरुणीनं चक्क आपल्या आईचे 11 तोळे दागिने आणि एक लाख 55 हजारची रोकडही दिली.

Chhatrapati Sambhajinagar Crime : प्रेमात सर्व काही क्षम्य असतं आपण हे कायम ऐकत अथवा वाचत असतो. असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. यात कर्जबाजारी प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने आपल्या आईचे दागिने दिल्याचे समोर आलं आहे. 19 वर्षीय तरुणीनं चक्क आपल्या आईचे 11 तोळे दागिने आणि एक लाख 55 हजारची रोकडही दिली. कर्जबाजारी प्रियकराने प्रेयसीला तिच्याच आईचे दागिने काढून देण्यासाठी गळ घातली. परिणामी प्रेमात बुडालेल्या प्रेयसीने हे कृत्य केलं आहे. ही घटना शहतील भारतनगर, एन 13, हडको भागात घडली. मंगेश विलास पंडित आणि 19 वर्षीय तरुणी अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. तर मंगेशसह त्याचा मित्र कुणाल केरकर यांना बेगमपुरा पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 58 वर्षीय महिला या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत. शनिवारी सकाळी रक्षाबंधन असल्याने त्यांच्या मुलाने आईकडे वापरण्यासाठी सोन्याची अंगठी मागितली. तेव्हा महिलेने कपाटात पहिले तेव्हा दागिन्यांच्या सर्व डब्या रिकाम्या दिसल्या. तसेच 1 लाख 55 हजाराची रोकड देखील गायब असल्याचे दिसून आले. या वेळी तरुणीला विचारपूस केली असता तेव्हा तिने सर्व दागिने दोन महिन्यापूर्वीच रुमालात गुंडाळून दिल्याचे सांगितले. हे ऐकून महिलेला मोठा धक्का बसला. तिने सोमवारी (दि.11) बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख करत आहेत.

प्रियकराला प्रेयसीने घरातले नेमके कोणते दागिने दिले?

प्रत्येकी 24 आणि 21 ग्रामच्या 2 चैन, 3 ग्रामची कानातील रिंग, 10 ग्रामचे सोन्याचे नाणे, प्रत्येकी 10 ग्रामच्या 3 अंगठ्या, 4 ग्रामचे सोन्याचे पदक, अडीच ग्रामची रिंग, 2 ग्रामची अंगठी, सोन्याच्या 3 ग्रॅमच्या बाळ्या, अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र, 10 ग्रामचे कानातले जोड, चांदीची अंगठी आणि 1 लाख 55 हजार रुपये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने तरुणीकडे पैशाची गरज असल्याचे सांगून तिच्याकडे पैशाची मागणी केली होती. प्रेमात वेडी झालेलया तरुणीने स्वतःच्या आईचे दागिने रुमालात गुंडाळले. एका रात्री तिने दोरी बांधून बकेटमध्ये दागिने टाकून खाली सोडले. ते दागिने संशयित आरोपीने त्याचा मित्र कुणालच्या मदतीने घेतले होते. त्याने दागिन्यांचे काय केले हे अजूनही समोर आलेले नाही. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Judge Shocking Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Embed widget