Karthikeya 2 : निखिल सिद्धार्थच्या 'कार्तिकेय 2'चा येणार सीक्वल; टीझर आऊट
Karthikeya 2 : निखिल सिद्धार्थ, अनुपम खेर आणि अनुपमा परमेश्वरन यांनी नुकताच 'कार्तिकेय 2' चा टीझर आऊट केला आहे.
Karthikeya 2 : 'कार्तिकेय' (Karthikeya) या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला असून या सिनेमाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2014 साली 'कार्तिकेय' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 'कार्तिकेय 2' (Karthikeya 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.
'कार्तिकेय 2' हा तेलुगू भाषेतील सिनेमा दोन भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा चंदू मोंडेटी यांनी सांभाळली आहे. तर टीजी विश्व प्रसाद आणि अभिषेक अग्रवाल यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात निखिल सिद्धार्थ, अनुपमा परमेश्वरन, श्रीनिवास रेड्डी, विवा हर्षा आणि आदित्य मेनन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
'कार्तिकेय 2' हा सिनेमा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणारा आहे. या सिनेमाची कथा भावनांनी भरलेली आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचा हिंदी टीझर निखिल सिद्धार्थ, अनुपम खेर आणि अनुपमा परमेश्वरन यांच्या हस्ते लॉंच करण्यात आला आहे. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
View this post on Instagram
'कार्तिकेय 2' या सिनेमासंदर्भात अभिषेक अग्रवाल म्हणाला, 'कार्तिकेय 2' हा आतापर्यंतचा आमचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. चंदूने स्क्रिप्ट सांगितल्यावर, आम्हाला माहित होते की आम्हाला हा सिनेमा करायचा आहे. हा एक धर्माचा उत्सव आणि प्रेक्षकांना आनंद देणारा सिनेमा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना एका साहसी मार्गावर घेऊन जाईल. हा सिनेमा रहस्यमय आहे."
सिनेमासंदर्भात टी.जी विश्व प्रसाद म्हणाले,"कार्तिकेयच्या पात्रात पौराणिक आणि ऐतिहासिक कथांचा शोध आणि विस्तार करण्याची क्षमता आहे. 'कार्तिकेय 2' हा विश्वासाने परिपूर्ण प्रकल्प आहे. या सिनेमाची प्रेक्षकांसोबत आम्हालादेखील उत्सुकता आहे".
संबंधित बातम्या