एक्स्प्लोर

Justice Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती; 14 मे रोजी घेणार शपथ

Justice BR Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांची भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Justice BR Gavai: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पुढील मुख्य न्यायमूर्तीसाठी भूषण गवई (Justice Bhushan Gavai) यांच्या नावाला परवानगी दिली आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांची भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गवई हे 14 मे रोजी देशाचे पुढील न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. विद्यामान सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना 13 मे रोजी निवृत्त होणार आहे. 

न्यायाधीश भूषण गवई यांची कारकीर्द-

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. भूषण गवई यांनी 16 मार्च 1985 रोजी वकिली सुरू केली. 1990 नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर भूषण गवई यांनी वकिली केली. 12 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांची उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनात्मक खंडपीठांचा ते भाग होते ज्यांनी ऐतिहासिक निकाल दिले आहेत.

कोण आहेत भूषण गवई?

सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांनी 16 मार्च 1985 रोजी वकिली क्षेत्रात प्रवेश घेतला आणि सुरुवातीला 1987 पर्यंत माजी महाधिवक्ता आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश स्वर्गीय राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. 1987 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली सुरू केली आणि 1990 पासून ते प्रामुख्याने नागपूर खंडपीठासमोर हजर राहिले. भूषण गवई यांनी संवैधानिक आणि प्रशासकीय कायद्यात विशेष तज्ज्ञता मिळवली आणि नागपूर आणि अमरावती महानगरपालिका तसेच अमरावती विद्यापीठासाठी स्थायी वकील म्हणून काम केले. भूषण गवई यांनी विदर्भातील विविध सरकारी संस्था आणि परिषदांचे नियमितपणे प्रतिनिधित्व केले.

ऑगस्ट 1992 मध्ये न्यायमूर्ती गवई यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर जानेवारी 2000 मध्ये भूषण सरकारी वकील आणि सरकारी वकील झाले. 14 नोव्हेंबर 2003 रोजी भूषण गवई यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली आणि 12 नोव्हेंबर 2005 रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. त्यांच्या कार्यकाळात, भूषण गवई यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठांचे अध्यक्षपद भूषवले आणि सर्व क्षेत्रातील प्रकरणे हाताळली. 24 मे 2019 रोजी भूषण गवई यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली. सध्या ते न्यायमूर्ती खन्ना यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी येथे भूषण गवई यांनी न्यायाधीश म्हणून काम केले आहे.

भूषण गवई होते कलम 370 रद्द करणाऱ्या खंडपीठाचा भाग-

कलम 370 रद्द करून जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचे समर्थन करणाऱ्या खंडपीठाचा भूषण गवई भाग होते. 2016 च्या नोटाबंदीला घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य घोषित करणाऱ्या खंडपीठाचेही ते सदस्य होते. निवडणूक देणग्यांसाठी इलेक्टोरल बाँड योजना रद्द करण्याचा निर्णय देणाऱ्या खंडपीठाचाही भूषण गवई हे भाग होते.

महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; कॅबिनेटमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह माजी मंत्र्यांवरही गुन्हा दाखल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget