Raju Shetty : 'चळवळीतील लोक एकत्र...'; दीड तास कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा, जरांगेंच्या भेटीनंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
Raju Shetty : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. यावर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Raju Shetty : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. यावर राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, मी आज त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो. परंतु चळवळीतली माणसं एकत्रित आले होते, तब्येतीची चौकशी केली असं म्हणता येणार नाही. चळवळीतील लोक एकत्र आल्यामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय या विषयावर चर्चा झाली.आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. कष्ट करणाऱ्या वर्गाला आवाज देण्याचं काम आमच्या माध्यमातून सुरू आहे. बघू एखाद्या वेळी आम्हाला सुध्दा यश येईल, असंही यावेळी राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
चळवळीतली माणसे एकत्र आल्यानंतर केवळ तब्येतीची विचारपूस केली असं होत नाही. यावेळी अन्य काही विषयांवर देखील चर्चा झाली. कष्ट करणाऱ्या वर्गाला आवाज देण्याचं काम आमच्या माध्यमातून सुरू आहे. बघूया एखाद्या वेळी आम्हाला सुध्दा यश येईल अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर राजू शेट्टींनी (Raju Shetty) दिली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आज आपल्या दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे (manoj jarange patil) यांची अंतरवली सराटी मध्ये भेट घेतली. दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली, दोन चळवळीचे लोक एकत्रित बसल्यावर केवळ तब्येतीची चर्चा होते असं नाही म्हणत राजू शेट्टी यांनी सामाजिक राजकीय बाबीवर चर्चा झाल्याचं यावेळी सांगितलं, दरम्यान कष्टकरी वर्गाला एकत्रित येण्यासाठी आम्ही हाक देत असून, एखाद्या वेळी त्याला यश येईल अशी आशा देखील राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे (manoj jarange patil) तयारीला लागले आहेत. ते काही दिवसांतच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अशातच राजू शेट्टी आणि मनोज जरांगे यांच्या चर्चेला महत्त्व प्राप्त झालं आहे. या भेटीमध्ये विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली असल्याचं राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी विधानसभेच्या जागा लढणार असल्याचं जाहीर केलं त्यानंतर राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्याकडून तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे आता तिसरी आघाडी होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. तिसरी आघाडी होणार का? या आघाडीचा फटका महायुतीला बसणार का महाविकास आघाडीला? याबाबतही चर्चांणा उधाण आलं आहे.