एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : मंत्री असो, आमदार असो की खासदार, संतोष भैय्याच्या सर्व मारेकऱ्यांना अटक करा, मनोज जरांगे संतापले, सरकारला थेट इशारा

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर मनोज जरांगेंनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरणाचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे फरार झाले असून ते आज सीआयडी शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जर आरोपींना अटक झाली नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.  

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. समाजाला वाटलं सरकार दिशाभूल करत आहे. गोड-गोड बोलत आहे, त्या दिवशी राज्य बंद पडलेले दिसेल. तुम्ही गुंडगिरी करणाऱ्यांना पोसायला लागलात का? पळून जायला तुम्ही मदत करायला लागलात का? फरार आरोपीला मदत करायला लागलात का? आणखी थोड्या दिवसात पूर्ण राज्यात आंदोलन होणार आहे. आपण आपल्या जिल्ह्यात बैठका घ्या, कोणाची वाट बघू नका, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करा, संदीप क्षिरसागर, सुरेश धस, बजरंग सोनवणे लढत आहेत. राज्यातील सगळ्या आमदारांनी या कुटुंबाच्या पाठीमागे राहावे. आरोपीला पाठीशी घालू नये, असे मनोज जरांगेंनी म्हटले.  

सर्व मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे

वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी ते ऐकलं नाही त्यावर अधिक बोलता येणार नाही. सरकारने कुणाचाही मुलाहिजा बाळगला नाही पाहिजे. अजून आरोपी फरार आहे. या सर्व दहा-वीस जणांना पाठीशी घालणारा कोण? आम्हाला संतोष भैयाच्या प्रकरणातील सर्व मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे. त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत. मग ते कोणत्याही पदावर असोत. मंत्री असो, आमदार असो की खासदार असो, खून करणाऱ्या आरोपीच्या पाठीशी जे जे उभे राहील. सरकारकडे येणारे जाणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. जर आरोपींना अटक झाली नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे. 

आणखी वाचा 

Santosh Deshmukh Case : इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 भारतीय बँकिंगला नवी दिशा मिळणार, पतंजलीकडून 360° ERP सिस्टीम लाँच, जाणून घ्या सविस्तर माहिती 
 भारतीय बँकिंगला नवी दिशा मिळणार, पतंजलीकडून 360° ERP सिस्टीम लाँच, जाणून घ्या 
Youtube  ची मोठी घोषणा, भारतात 850 कोटींची गुंतवणूक करणार, भारतीय किएटर्सनी किती रुपये कमावले,यूट्यूबच्या सीईओंनी दिली माहिती
Youtube भारतात 850 कोटींची गुंतवणूक करणार, भारतीय किएटर्सनी तीन वर्षात कमावले तब्बल 21000 कोटी
तुम्ही 2029 मध्ये 84 वर्षांचे होणार, आता रिटायर व्हा, दुसरे नेतृत्व तयार करा; ठाकरे गटातून प्रवेश करणाऱ्या केपींना अजित पवारांचा सल्ला
तुम्ही 2029 मध्ये 84 वर्षांचे होणार, आता रिटायर व्हा, दुसरे नेतृत्व तयार करा; ठाकरे गटातून प्रवेश करणाऱ्या केपींना अजित पवारांचा सल्ला
स्कूल चले हम... दहशतवादाला झुगारत 'दर्द'पुरात भरतेय शाळा; 'सरहद'वरील चिमुकल्यांना सॅल्यूट, पाहा फोटो
स्कूल चले हम... दहशतवादाला झुगारत 'दर्द'पुरात भरतेय शाळा; 'सरहद'वरील चिमुकल्यांना सॅल्यूट, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 02 May 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सKashmir Gujjar Community : Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप, काश्मिरी गुज्जर समाजाचं मत काय?Job Majha : हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता किती? एकूण जागा किती? 02 MayNitin Deshmukh Akola : हिवाळी अधिवेशनाआधी कर्जमाफी दिली नाही तर.. नितीन देशमुखांचा थेट इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 भारतीय बँकिंगला नवी दिशा मिळणार, पतंजलीकडून 360° ERP सिस्टीम लाँच, जाणून घ्या सविस्तर माहिती 
 भारतीय बँकिंगला नवी दिशा मिळणार, पतंजलीकडून 360° ERP सिस्टीम लाँच, जाणून घ्या 
Youtube  ची मोठी घोषणा, भारतात 850 कोटींची गुंतवणूक करणार, भारतीय किएटर्सनी किती रुपये कमावले,यूट्यूबच्या सीईओंनी दिली माहिती
Youtube भारतात 850 कोटींची गुंतवणूक करणार, भारतीय किएटर्सनी तीन वर्षात कमावले तब्बल 21000 कोटी
तुम्ही 2029 मध्ये 84 वर्षांचे होणार, आता रिटायर व्हा, दुसरे नेतृत्व तयार करा; ठाकरे गटातून प्रवेश करणाऱ्या केपींना अजित पवारांचा सल्ला
तुम्ही 2029 मध्ये 84 वर्षांचे होणार, आता रिटायर व्हा, दुसरे नेतृत्व तयार करा; ठाकरे गटातून प्रवेश करणाऱ्या केपींना अजित पवारांचा सल्ला
स्कूल चले हम... दहशतवादाला झुगारत 'दर्द'पुरात भरतेय शाळा; 'सरहद'वरील चिमुकल्यांना सॅल्यूट, पाहा फोटो
स्कूल चले हम... दहशतवादाला झुगारत 'दर्द'पुरात भरतेय शाळा; 'सरहद'वरील चिमुकल्यांना सॅल्यूट, पाहा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 मे  2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 मे  2025 | शुक्रवार
देशाच्या पहिल्या नौदल प्रमुखांच्या लेकीचं हिमांशीला पत्र; तू, सैन्य अधिकाऱ्याची आदर्श पत्नी, तुझे धन्यवाद!
देशाच्या पहिल्या नौदल प्रमुखांच्या लेकीचं हिमांशीला पत्र; तू, सैन्य अधिकाऱ्याची आदर्श पत्नी, तुझे धन्यवाद!
तापमान वाढलेल्या सोलापुरात पेट्रोल पंपावरच 'स्कॉर्पिओ' जळून खाक; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
तापमान वाढलेल्या सोलापुरात पेट्रोल पंपावरच 'स्कॉर्पिओ' जळून खाक; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
भारत-पाकिस्तान सीमेवरचं शेवटचं गाव, 'दर्द'पुरातील शाळकरी मुलांचं दु:ख; दहशतवाद्यांच्या भीतीनं जीव मुठीत घेऊन शिक्षण
भारत-पाकिस्तान सीमेवरचं शेवटचं गाव, 'दर्द'पुरातील शाळकरी मुलांचं दु:ख; दहशतवाद्यांच्या भीतीनं जीव मुठीत घेऊन शिक्षण
Embed widget