(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"आधी म्हणाले माझी महेबूबा, आता म्हणतात आपलं जमत नाही"; दानवे-खोतकर वादाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?
Raosaheb Danve VS Arjun Khotkar : महायुतीतील दोन दिगज नेत्यांमध्ये सर्व काही अलबेल नाही असेच दिसतेय.
Raosaheb Danve vs Arjun Khotkar : 'तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना' अशीच काही राज्याच्या राजकारणात ओळख असलेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यात नव्या वादाचा दुसरा अध्याय सुरुय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचं कारण देखील तसचं आहे. शुक्रवारी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्या भोकरदन मतदार संघातील भाजपच्या 100 कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश करून घेतला. त्यात रावसाहेब नावाच्या पक्ष कार्यकर्त्यांला खोतकर यांनी उद्देशून आपलं आणि रावसाहेब नावाच जमत नसल्याच म्हणत मिश्कील टोला लगावला. त्यांचा हाच व्हिडीओ आता समोर आला आहे.
विशेष म्हणजे, गेल्यावर्षीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी या दोन्ही नेत्यांमधील वाद थेट दिल्लीत बोलावून मिटवला होता. पण आता या दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले अर्जुन खोतकर?
अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्या भोकरदन मतदार संघातील भाजपच्या 100 कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश करून घेतला. त्यात रावसाहेब नावाच्या पक्ष कार्यकर्त्यांला खोतकर यांनी उद्देशून आपलं आणि रावसाहेब नावाच जमत नसल्याच बोलून दाखवलं. त्यांच्या मिश्किल टिपण्णी मागे काही राजकीय गांभीर्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात खोतकर यांनी कालच दानवे पिता पुत्रांच्या मतदारसंघात अवैध धंदे बोकाळल्याची तक्रार देखील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली होती. त्यामुळे महायुतीतील दोन दिगज नेत्यांमध्ये सर्व काही अलबेल नाही असेच दिसतेय.
मेहबूबा ते पटत नाही पर्यंतचा वाद...
लोकसभा निवडणुकीत जालना येथे युतीची सभा झाली होती. यावेळी खोतकर यांनी भाषण करताना, रावसाहेब दानवे आणि मी दोघेही 30 वर्षांचे जोडीदार आहोत. खरंतर रावसाहेब दानवे हे माझी मेहबूबा आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात. ही जोडगोळी तीस वर्ष विधानसभेपासून लोकसभेपर्यंत काम करते, असे खोतकर म्हणाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा वरिष्ठांनी वाद मिटवला. त्यात आता खोतकर यांच्या वक्तव्याने या दोन्ही नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :