OBC Sabha: 'ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणं आमचं कर्तव्य', जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा
OBC Sabha : मराठा आंदोलन पेटलेल्या अंतरवली सराटीपासून अवघ्या 20 किमी अंतरावर अंबड येथे ओबीसी मोर्चाची जाहीर सभा आहे.
जालना : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून (OBC Resevation) आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव एल्गार सभेच आयोजन करण्यात आले आहे. जालन्यातील (Jalna OBC Sabha) अंबड येथे आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर आणि पडळकर उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ही भव्य सभा होणार आहे. मराठा आंदोलन पेटलेल्या अंतरवली सराटीपासून अवघ्या 20 किमी अंतरावर अंबड येथे ओबीसी मोर्चाची जाहीर सभा आहे.
ओबीसी हा मोठा वर्ग आहे. या समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. समाजाच्या हक्कासाठी मी सभेला जातोय, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिलीय. तर माझी भूमिका स्वयंम स्पष्ट आहे, माझ्या फॉलोअर्सना ते माहिती आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलीय.
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी सभेला जातोय : विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी हा मोठा वर्ग आहे. या समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. समाजाच्या हक्कासाठी मी सभेला जात आहे. दुसऱ्याच्या हक्काचे कोणी हिरावून घेऊ नये. संविधानाच्या संरक्षणचे कवच आहे ते तोडण्याचे काम कोणी करू नये.
माझी भूमिका स्वयंम स्पष्ट आहे : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी काही संदेश देणार नाही या बाबत अनेकदा व्यक्त झाले आहे माझ्या शिव शक्ती यात्रेत ही मांडले आहे. ज्यावेळी घटना घडल्या त्या वेळी माझी भूमिका मांडली आहे आता वेगळं काही मांडण्याची आवश्यकता नाही. माझी भूमिका स्वयंम स्पष्ट आहे, माझ्या फॉलोअर्सला माहिती आहे. मेळाव्याला मी मनापासून शुभेच्छा देते, छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याविषयी आदर आणि प्रेम आहे. मुंडे साहेबांनी जी वंचिताची चळवळ उभी केली त्याच्यात एक सच्चा मित्र म्हणून ते सोबत होते. ते काय बोलतात या विषयी उत्सुकता आहे.
हे ही वाचा :
ओबीसी सभेच्या पार्श्वभूमीवर जालन्यात 'जमाव बंदी'चे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई