(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा आरक्षणाची आतापर्यंत सर्वात मोठी बातमी! 'ओबीसी'मधून आरक्षण मिळणे अडचणीचे?
Babanrao Taiwade : ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलेल्या एका दाव्याने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अडचणीचे असल्याचे बोलले जात आहे.
जालना : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून केली जात आहे. तर, दुसरीकडे मात्र ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी केलेल्या एका दाव्याने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अडचणीचे असल्याचे बोलले जात आहे. त्याचं कारण देखील तसेच आहे. कारण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे लेखी आश्वासनच सरकराने ओबीसी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला दिला असल्याचा दावा तायवाडे यांनी केला आहे. जालन्यातील (Jalna) वडागांद्रा येथील ओबीसी बचाव साखळी उपोषण सोडवण्यासाठी बबनराव तायवाडे उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, यावेळी बोलतांना बबनराव तायवाडे म्हणाले की, "ओबीसी प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने सरकारची 29 सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. यावेळी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे लेखी आश्वासन सरकारने दिले आहे. सोबतच, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ असे सरकारने आजपर्यंत कुठेही असे म्हटले नाही. सरकारने आपल्याला दिलेला हा शब्द तीन महिन्यांपासून बदललेला नाही. त्यामुळे आम्हाला सरकारवर विश्वास आहे, असे बबनराव तायवाडे म्हणाले.
लेखी आश्वासन दिल्याने मराठा आरक्षणाचे काय?
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत आहे. आम्ही आधीपासूनच ओबीसत असून, आमच्या लाखो कुणबी नोंदी देखील सापडल्या असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. आम्हाला ओबीसी आरक्षणाचे सर्व लाभ मिळाले पाहिजे असेही जरांगे म्हणाले आहेत. मात्र, आता सरकराने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे लेखी आश्वासनच ओबीसी नेत्यांना दिले असल्याचा दावा तायवाडे यांनी केला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचे काय? तसेच मराठा ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे आणि कोणत्या मार्गाने दिले जाणार? याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे मुंबईतील उपोषणावर ठाम...
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर लाखो मराठ्यांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे आंतरवाली सराटी येथून पायी दिंडी काढत मुंबईकडे कूच करणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असून, जरांगे यांनी मुंबईतील आंदोलन करू नयेत अशी भूमिका सरकारची आहे. मात्र, मनोज जरांगे हे आपल्या मुंबईतील उपोषणावर ठाम आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: