Maratha Reservation : मोठी बातमी! अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी सक्तीच्या रजेवरील तुषार दोषींची बदली
Jalna Police :अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्या प्रकरणी सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली झाली आहे.
Maratha Reservation : जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी (Anatarwali Sarati) येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी अमानुष लाठीमार केला असल्याचा आरोप झाला होता. त्यांमुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते. त्यानंतर, या सर्व प्रकरणाची गृह विभागाने गंभीर दखल घेत जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी (IPS Tushar Doshi) यांच्यावर पहिली कारवाई केली होती. पोलीस अधीक्षक दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश गृह विभागाने काढले होते. मात्र, आता दोषी यांची जालना येथून बदली करण्यात आली आहे. तुषार दोषी यांची बदली पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आजच आंतरवाली सराटीतील लाठीमारचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते याची माहिती समोर आली होती. तर, दुसरीकडे आजच तुषार दोषी यांच्या देखील बदलीचे आदेश निघाले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी गावात उपोषणास बसले होते. मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलेले. उपोषणात त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. त्यामुळे पोलिसांनी जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच दरम्यान आंदोलनाचे समर्थक आणि पोलिसांमध्ये वाद झाला आणि अखेर त्याचे पर्यावसन लाठीचार्ज करण्यात झाला.
पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीहल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस आणि सरकारवर चहूबाजूने टीका सुरू झाली होती.
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आणि शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली होती.
पहिली कारवाई तुषार दोषींवर
मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत उपोषण सुरू असताना, पोलीस आणि आंदोलकांमध्ये राडा झाला. त्यानंतर पोलिसांकडून लाठीमार तर आंदोलकांनी दगडफेक केल्याचा आरोप झाला. मात्र, त्यानंतर जालन्यात घडलेल्या या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मराठा बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले.काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. दुसरीकडे, विरोधकांनीही सरकारवर टीकास्त्र डागले. तर, लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी होऊ लागली. त्यामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला. या सर्व पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर पहिली कारवाई करण्यात आली आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. मात्र, आता त्यांची जालना येथून बदली करण्यात आली आहे.
प्रकरण काय?
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी गावात उपोषणास बसले होते. मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलेले. उपोषणात त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. त्यामुळे पोलिसांनी जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच दरम्यान आंदोलनाचे समर्थक आणि पोलिसांमध्ये वाद झाला आणि अखेर त्याचे पर्यावसन लाठीचार्ज करण्यात झाला.
पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीहल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस आणि सरकारवर चहूबाजूने टीका सुरू झाली होती.
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आणि शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली.
जालन्यात घडलेल्या लाठीचार्जनंतर त्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. या घटनेनंतर मनोज जरांगे यांच्याकडे मराठा आरक्षण आंदोलनाची सूत्रे आली.