Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनामागे कोणाचा 'आर्थिक' अदृश्य हात?
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या जे नाव केंद्रस्थानी आहे त्या मनोज जरांगेंवर सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) सध्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर केंद्रस्थानी असलेलं नाव गेल्या काही दिवसांपासून खूप गाजत आहे. दरम्यान या लोकप्रियतेच रहस्य काय? जरांगे यांच्या आंदोलना मागे नेमक आर्थिक पाठबळ कोणाच आहे यांसारखे अनेक प्रश्न सध्या अनेकांच्या मनात निर्माण झाले आहेत. तारीख 29 ऑगस्ट ,स्थळ पैठण फाटा , शहागड जिल्हा जालना, दुपारी 12 वाजताच्या रखरखत्या उन्हात एकटवलेला मराठा समाजाचा हजारोंचा समुदाय मनोज जरांगे च्या हाकेला प्रतिसाद देत एकटवला. त्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुकण्यात आले.
जरांगे यांनी तीन जिल्ह्यातील 123 गाव अनेक महिन्यांपासून पिंजून काढली होती. त्यानंतर त्यांनी हीच गावं आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र देखील केली. त्याच दिवशी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत जरांगे यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली. हीच सुरुवात जरांगे यांना स्वत:च्या लोकप्रियतेकडे घेऊन गेल्याचं म्हटलं जात आहे. 1 सप्टेंबर रोजी त्यांच्या आरोग्याचं कारण देत सरकारने पोलिसांमार्फत मनोज जरांगे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी झालेली चकमक आणि राडा हा देशभर गाजला. परिणामी आरक्षणाच्या मुद्द्यावर अगोदरच तयार असेलेल्या व्यासपीठावर मनोज जरांगे यांची ग्रँड एन्ट्री झाली.
'आरक्षण ओबीसी प्रवर्गातूनच'
मनोज जरांगे यांची मागणी देखील एका मोठ्या समूदायाचं लक्ष वेधून घेणारी ठरली. कारण सार्वजनिक आणि मोठ्या व्यसपीठावरुन करण्यात आलेली ही पहिलीच मागणी होती. ती मागणी म्हणजे मराठा समाजाला केवळ ओबीसी प्रवर्गातूनच तेही 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावं ही. त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखी एक रहस्य दडलेलं होतं. जरांगे यांची संवादाची लकब, टोकदार भूमिका, आणि आंदोलनातील पारदर्शकता ग्रामीण भागातील मराठा तरुणांना आकर्षित करणारी ठरली.
जरांगेंच्या मागे अदृश्य हात?
जरांगे यांच्या भावलेल्या ग्रामीण नेतृत्वामुळे 30 सप्टेंबर त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली.दौऱ्यामध्ये त्यांच्यावर जेसीबीद्वारे फुलांची उधळण करण्यात आली आणि त्यांच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पण याच बरोबर हजारोंच्या संख्येने एकवटलेला मराठा समाजाची ठिकठिकाणी होत असलेली सुविधा, शेकडो गाड्यांचा ताफा 14 ऑक्टोम्बर रोजी त्यांचे होणारे जंगी स्वागत हे काहिसं सवाल उपस्थित करणारे आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मागे कोणते अदृश्य हात तर नाही असा प्रश्न निर्माण केला जातोय. पण आंदोलनाची ही मागणी जुनीच असून या आंदोलनाला सढळ हाताने मदत करणारे देखील अनेक जण असल्याचं सांगण्यात येतय.
तर येत्या 14 तारखेला जरांगे यांची अंतरवली गावात जंगी सभा होतेय. या सभेला लाखोंचा समुदाय एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात असून जरांगे यांची आणि आंदोलकांची अग्निपरीक्षा होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.