एक्स्प्लोर

Manoj Jarange: शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या, 29 ऑगस्ट मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange: 29 ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली आहे. 29 ऑगस्टला मुंबई धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचामनोज जरांगे-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितला आहे. आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या कारणच नाही येत आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही, आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही. मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचा उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. 28 ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 

दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत.मागील उपोषण सोडताना चार मागण्या तात्काळ अंमलबजावणी केले जाईल असे सांगितलं होतं. आज तीन महिने पूर्ण झाले, कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. मला समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघाव्या लागतात, संयम तरी किती दिवस धरायचा. 29 ऑगस्ट 2025 ला आम्ही मुंबईत जाणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. हे मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघत नाही हे आमच्या लक्षात आलं आहे. मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकतीने उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्टच्या अगोदर काम आवरून ठेवा. आता माघारी यायचं नाही, सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला दीड वर्ष पूर्ण झाला आहे. पुढील आंदोलनाची दिशा एक ऑगस्ट रोजी सांगणार आहे.सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली, असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 

यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हक्काचा आहे ते आम्हाला द्या. कोणी विरोध केला तरी ते आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्या ते रोखू नका असं आवाहन देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे, या दोन ठिकाणावरती उपोषण करणार आहे. शांततेत उपोषण केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. समाजाला सांगतो तुम्ही रुसू नका. मी उपोषण केलं की, तुम्ही रुसता. तुम्ही रुसायचं नाही तुम्ही ताकतीने माझ्यासोबत आलं पाहिजे. तुमच्या मुलांसाठी मी हे करतोय. आपल्या लेकरा बाळांचं चांगलं झालं पाहिजे. कडवट वागायचं, धाडसी वागायचं असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. एक ऑगस्टला आंदोलनाची पुढील दिशा आणि मार्ग सांगणार आहोत. आजपासून तयारी सुरू करण्यात आलेली आहे. चलो मुंबई मला फक्त 28 तारखेला मुंबईत नेऊन सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनीच मला सोडायला या मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळांसाठी लढायला. माझा समाज माझ्या मागे आहे. सात कोटी मराठा माझ्यासोबत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा दिला आहे. फडणवीस साहेब सत्ता जात असते, माणसाच्या डोक्यात एकदा खुन्नस बसली तर सत्ता बदलल्यावर लोक बदले घेत असतात. फडणवीस खुनशीपणाने वागू नका, गर्वात राहू नका. 40 ते 50 वर्षाची काँग्रेसची सत्ता गेली तुमची पण जाईल. फडणवीस साहेब डोक्यात खुन्नस बसली सत्ता बदलल्यावर बदले घेत असतात.आमच्याशी खुनशीपणाने आणि आकसाने वागू नका. तुम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं, काँग्रेसची सत्ता पलटेल, काँग्रेसने 40 ते 50 वर्ष राज्य केलं. तुमची आली तसं तुमची सुद्धा पलटत असते, गर्वात वागू नका. तुम्ही गॅझेटीयर, केसेस आणि मराठा आणि कुणबी एक आहेत याचे अध्यादेश तातडीने काढा. नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Embed widget