एक्स्प्लोर

Laxman Hake: जरांगे म्हणतात 80 टक्के मराठा ओबीसीत घुसवलाय, राज्यात बोगस कुणबी घोटाळा; लक्ष्मण हाकेंचा आरोप

Jalna News:लक्ष्मण हाकेंची सरकारी शिष्टमंडळाकडून मनधरणी, मंत्र्यांनी स्वत: बीपी चेक केला, लक्ष्मण हाके यांच्याकडून राज्यात बोगस कुणबी घोटाळा झाल्याचा आरोप, लेखी आश्वासनाच्या मागणीवर ठाम.

जालना: ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य धादांत खोटे आहे. मी आयोगाचा सदस्य आहे. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे माहिती आहेत. राज्य सरकारने कायद्यात खाडाखोड करुन 54 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटली. या माध्यमातून राज्यात बोगस कुणबी (Maratha Kunbi) घोटाळा झाला आहे, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला. लक्ष्मण हाके हे गेल्या चार दिवसांपासून जालन्यात ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) रक्षणासाठी प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.

मात्र, जोपर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत मी माघार घेणार नाही, असा निर्धार लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणतात की, मी 80 टक्के मराठा ओबीसीत घुसवला आहे. जरांगे यांचा हा दावा खरा असेल तर मूळ ओबीसींचे आरक्षण कसे टिकेल, हे सरकारने सांगावे. अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसींचे हक्क टिकवण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार काय करत आहे, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. जरांगे म्हणतात त्याप्रमाणे 80 टक्के मराठा समाज कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गात घुसला आहे. 

हे ओबीसींच्या हक्कांवरील अतिक्रमण आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक न्याय उरलाय का, याचं उत्तर मिळाल्याशिवाय मी आमरण उपोषण मागे घेणार नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची सरकारने गंभीर दखल घेत अतुल सावे आणि डॉ. भागवतराव कराड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सोमवारी त्यांच्या भेटीला गेले होते. अतुल सावे आणि डॉ. भागवत कराड यांच्याकडून लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना किमान पाणी पिण्याचा आग्रह करण्यात आला. तुम्ही तुमचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला चला, अशी विनंती अतुल सावे यांनी केली. यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्याकडून एक शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईला येणार आहे. यावेळी अतुल सावे आणि भागवतराव कराड यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना किमान पाणी पिण्याचा आग्रह केला. डॉ. भागवतराव कराड यांनी स्वत: लक्ष्मण हाके यांचा रक्तदाब तपासून पाहिला. डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की, लक्ष्मण हाके यांचा हार्ट रेट वाढलेला आहे. त्यांनी पाणी घेतल नाही तर त्यांना किडनीला त्रास होण्याची शक्यता आहे, असे भागवतराव कराड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आणखी वाचा

57 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करा, सगेसोयरेंच्या जीआरला विरोध; ओबीसी नेत्यांच्या बैठकीत विधानसभेच्या 288 जागा लढवण्याचा ठराव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
नाशिक शिक्षक ते मुंबईतील दोन्ही जागांसह कोकण पदवीधरमध्ये मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
Kalki 2898 AD advance booking Box Office : बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300  रुपयांवर
बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300 रुपयांवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray and Aaditya Thackeray : PMC Action on Bar : बाणेर परिसरातल्या 'द कॉर्नर लाऊंज' बारवर पुणे पालिकेचा हातोडाABP Majha Headlines : 01 AM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
नाशिक शिक्षक ते मुंबईतील दोन्ही जागांसह कोकण पदवीधरमध्ये मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
Kalki 2898 AD advance booking Box Office : बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300  रुपयांवर
बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300 रुपयांवर
Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
Indian Web Series for Couple : प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Embed widget