एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : ...तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीच, 20 तारखेआधी निर्णय घ्या ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Maratha Reservation Latest News : सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Manoj Jarange Patil PC : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला आहे. 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी सरकारचं अधिवेशन आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. नोदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण देणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आरक्षण टिकावं म्हणून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे.

जरांगे सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर ठाम

जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आम्ही सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणी वर ठाम आहोत. मराठ्यांना फसवलं तर सोडणार नाही. सरकारनं धोरण ठरवलं असलं तरी मराठेही धोरण ठरवणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे

सरकारने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारला आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमापत्र देण्यात येणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आज पत्रकार परिषदेत त्यांनी व्यक्त केलेले आरक्षण दिलं जाणार आहे. आरक्षण कोर्टात टिकावं म्हणून मागासवर्गीय अहवाल आलाय, तो याच आंदोलनामुळे झालं आहे..

...तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही - जरांगे

''ज्यांच्या कुणबी नोंदी सापडकयत आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सग्यासोयऱ्याचा कायदा आहे, त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असं जरांगेंनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील सगळा मराठा कुणबी आहे. कुणबी नोंदी सापडल्या त्यांना द्यावेच लागेल, मात्र मागासवर्गीय अहवाल घेऊन ते आरक्षण देताला, मात्र ते चालणार नाही, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्या शिवाय कोणाला सोडणार नाही. मागासवर्ग आयोगाचे पण राहु द्या, ज्यांना नकोय त्यांना जोर जबरदस्ती नाही. 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा. आंतरवलीसह सर्व गुन्हे मागे घ्या. 20 तारखेपर्यंतच मी उपोषण करत असतो, सरकारनं सरकारचं धोरण ठरवलं आहे, मराठे मराठ्यांचे धोरण ठरवणार आहेत. मागासवर्गीय आयोग, सग्यासोयऱ्यांचे आणि कुणबी या सर्वच बाजूने मराठयांना आरक्षण मिळणार'', असं जरांगेनी म्हटलं आहे.

मुंबईला गेल्याने आपली फसवणूक झाली नाही - जरांगे

जरांगे यांनी पुढे म्हटलं की, ''मुंबईला गेल्याने आपली फसवणूक झालेली नाही, तर सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणीत न करत सरकारने फसवणूक केली असं जरांगेंनी म्हटलं आहे. मुंबईला गेल्यामुळे गोड-गोड बोलले, आपली फसवणूक झाली, असं नाही, सगेसोयऱ्यांची अधिसूचना निघाली. मराठा समाजाच्या सगळ्या मुलींना एकही रुपया न देता मोफत शिक्षण मिळणार, असा कायदा आणि निर्णय घेऊन आपण मुंबईवरून आलो आहोत.''

20 फेब्रुवारीपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा

''फसवणूक किंवा गैरसमज झाला म्हणून आरक्षणाचा विषय संपणार नाही. काही जण म्हणतात आपल्याला फसवलं, फसवलं असेल तर फसवून दे पण, आपण सहजासहजी सोडणारे मोडक्या पायाचे नाहीत. पुन्हा लढा सुरु करू, आपण आपल्यावर विश्वास ठेवायचं. सगेसोयरा कायदा बनवून त्यांची अंमलबजावणी करण्यावरचं आम्ही ठाम आहोत'', असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Manoj Jarange Patil : हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंकडून उपचार घेण्यास होकार, सकल मराठा समाजाकडून आज 'चक्काजाम' आंदोलन

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange: टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय, दोन दिवस दारुची दुकाने राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय, दोन दिवस दारुची दुकाने राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
Manoj Jarange Patil and Eknath Shinde: मनोज जरांगेंनी पुन्हा तेचं केलं, एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख, जहाल भाषेत निर्वाणीचा इशारा
मनोज जरांगेंनी पुन्हा तेचं केलं, एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख, जहाल भाषेत निर्वाणीचा इशारा

व्हिडीओ

Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल, अभिजीत दीपके यांचा सरकारला इशारा
सरकारनं 'तो' प्रयत्न करु नये, मनोज जरांगेना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल : अभिजीत दीपके
Crime News: आधी पत्नीला संपवलं, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं; बोटंही छाटली, पोलिसांना खुलासा करताना म्हणाला,
आधी पत्नीला संपवलं, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं; बोटंही छाटली, पोलिसांना खुलासा करताना म्हणाला, "मला पश्चात्ताप नाही, मी बाहेर गेल्यावर तिच्या 'शुगर डॅडी'लाही..."
Accident News: महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू; नातेवाईकांची भेट अधुरी, नांदेड, भंडारा, अहिल्यानगरमध्ये शोककळा
महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू; नातेवाईकांची भेट अधुरी, नांदेड, भंडारा, अहिल्यानगरमध्ये शोककळा
Manoj Jarange: टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
FDA Action In Pune : खवा ओरिजनल, कोणतीही भेसळ नाही; तुकाराम मुंढेंनी...; पुण्यातील FDAच्या कारवाईनंतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया
खवा ओरिजनल, कोणतीही भेसळ नाही; तुकाराम मुंढेंनी...; पुण्यातील FDAच्या कारवाईनंतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया
Top 10 Billionaires: जगातील अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकेचं वर्चस्व,अमेरिकेबाहेरील एकमेव अब्जाधीश टॉप 10 मधून बाहेर  
अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकेचं वर्चस्व,अमेरिकेबाहेरील एकमेव अब्जाधीश टॉप 10 मधून बाहेर   
Bank Strike : सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँक कर्मचारी आज संपावर, कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय? 
सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँक कर्मचारी आज संपावर, कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय? 
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर थकले, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर हटवले, मात्र हनुमानाची मूर्ती जागची हलेना; पुजारीने सांगितलं आश्चर्यकारक कारण
इंजिनिअर थकले, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर हटवले, मात्र हनुमानाची मूर्ती जागची हलेना; पुजारीने सांगितलं आश्चर्यकारक कारण
Embed widget