एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Manoj Jarange Patil: आमरण उपोषणाला 90 तास उलटले, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रात्री अडीच वाजता सलाईन लावली

Maratha Aarkshan Hunger Strike: मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट; शरीरातील बीपी-शुगर प्रचंड खालावली, रात्री अडीच वाजता उपचारासाठी डॉक्टरांची धावाधाव. अंतरवाली सराटीतील आमरण उपोषणाचा पाचवा दिवस.

जालना: मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांनी 8 जूनला आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) तैनात असणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. मात्र,मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे बुधवारी पहाटे अडीच वाजता मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी आग्रह धरण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील आणि डॉक्टरांच्या टीमने मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढली. तेव्हा मनोज जरांगे उपचार घेण्यासाठी राजी झाले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तीन सलाईन लावण्यात आल्या. 

अंबडचे जिल्हाधिकारी चंद्रकांत शेळके यांनी मंगळवारी दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपचार करुन घेण्याची विनंती केली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीचे अपडेट्स सरकारला कळवले होते. राज्य सरकारकडून सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर लक्ष ठेवले जात आहे. अद्याप राज्य सरकारकडून कोणालाही मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करायला पाठवण्यात आलेले नाही. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती वेगाने खालावत असल्याने राज्य सरकार त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणार का, हे पाहावे लागेल.

मनोज जरांगेंचं ब्लड प्रेशर कमी

जालन्याच्या आरोग्य जिल्हाधिकारी जयश्री भुसारे यांच्या नेतृत्त्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. यानंतर डॉ. जयश्री भुसारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते की, मनोज जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला आहे. उपोषणाचा चौथा दिवस असल्याने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीही खालावली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना शक्य तितक्या लवकर उपचारांची गरज असल्याचे डॉ. जयश्री भुसारे यांनी सांगितले होते.

गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा डाव: मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी उपोषणाला बसलो आहे. एका बाजूला आमच्याशी चर्चा सुरु आहेत दुसरीकडे गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा आरोप मनोज जरांगेंनी केला होता. अद्याप दोन ते तीन दिवसांत कुठलाही संवाद सरकारतर्फे झालेला नाही. कुणी संपर्कही केलेला नाही. मी बेमुदत उपोषण सुरु आहे. बैठका घेऊ, निर्णय काढू, लाडीगोडी लावून बोलत आहेत. एकीकडून म्हणायाचं तातडीने मार्ग काढतो. बेमुदत उपोषण सुरु आहे तरीही पाच दिवस होऊ द्यायचे. यामागे सरकारचा डाव असू शकतो, असे जरांगे पाटील यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

Sharad Pawar : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपोषण मागे घेण्यासाठी थेट शरद पवारांची एन्ट्री?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-Sunil Bhusara Mumbai : मला मिळायला हवी ती मतं विरोधी उमेदवाराला मिळाली - सुनील भुसाराTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 25 Nov 2024 : 12 NoonNana Patole Delhi : विधानसभेच्या निकालाबाबत नाना पटोले राहुल गांधींसोबत चर्चा करणार  @abpmajhatv

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून पुरलं; 10 महिन्यांनी थेट जंगलात सांगाडाच सापडला
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून पुरलं; 10 महिन्यांनी थेट जंगलात सांगाडाच सापडला
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Embed widget