Sharad Pawar : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपोषण मागे घेण्यासाठी थेट शरद पवारांची एन्ट्री?
Manoj jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 8 जूनपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज सकल मराठा समाज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा 8 जूनपासून उपोषण (Hunger Strike) सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून गेले चार दिवस त्यांनी काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृतीही चिंताजनक झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिला असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये (Nashik) सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj) आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. सकल मराठा समाज राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवारांना (Sharad Pawar) साकडे घालणार असल्याची माहिती मिळत आहे.
आंदोलन मागे घेण्यासाठी थेट शरद पवारांची एन्ट्री?
महाविकास आघडीचे (Mahavikas Aghadi) नेतृत्व जसे शरद पवारांनी केले, तसेच सर्व पक्षीय आमदार खासदारांचे नेतृत्व करत मराठा समाजाला न्याय देत जरांगे पाटील यांचे आंदोलन थांबविण्यासाठी मागणी करण्याची शक्यता आहे. आता सकल मराठा समाज नेमकी काय भूमिका मांडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या