एक्स्प्लोर

तर ठरलं! छगन भुजबळांना जालन्यातूनच उत्तर मिळणार, मनोज जरांगेंच्या भव्य सभेचं आयोजन

Manoj Jarange : विशेष म्हणजे जालना येथील सभेतून मनोज जरांगे हे भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जालना : जिल्ह्यातील अंबडच्या सभेतून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची देखील आता जालन्यात (Jalna) भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी जालना शहरात ही सभा होणार आहे. याबाबतच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (18 नोव्हेंबर) जालना शहरातील मातोश्री लॉन्समध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. यावेळी 1 डिसेंबर रोजी जालना शहरातील आझाद मैदानात जरांगे यांच्या भव्य सभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सभेतून जरांगे हे भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे. 

मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आता आणखीनच वाढतांना पाहायला मिळत आहे. ज्या जालन्यातून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीची लढाई सुरु केली, त्याच जालन्यात ओबीसी सभा घेत भुजबळ यांनी जरांगे यांना आव्हान दिले. त्यामुळे आता भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी त्याच जालन्यात जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. 1 डिसेंबर रोजी जालना शहरातील आझाद मैदानात ही सभा होणार आहे. 

सभेतून भुजबळांना उत्तर देणार...

मनोज जरांगे यांच्या अनेक जिल्ह्यात सभा झाल्या आहेत. यापूर्वी आंतरवाली सराटीत राज्याची सभा झाली. पण जालना जिल्ह्यासाठीची जरांगे यांची अजूनही एकही सभा झाली नाही. त्यातच, जालना जिल्ह्यात येऊन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे. त्यामुळे आता जरांगे यांची जालना शहरात सभा घेण्याची तयारी सुरु होती, आणि यासाठी शनिवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित सभेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्यात 1 डिसेंबर रोजी भव्य अशी सभा आयोजित करण्याचा निर्णय झाला. 

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेणार 

या सभेस मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेणार आहे. मनोज जरांगे पाटलांची जालना शहरात आयोजित ही सभा मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. शहरात आयोजित या सभेच्या दिवशी व्यापारी बांधवांचे नुकसान होऊ नये याकरीता कुठल्याही बंदचे आवाहन करण्यात येणार नाही. सभेपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य रॅलीही रॅली काढण्यात येईल. जिल्ह्यात व शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल याबाबतचे नियोजन सदर बैठकीत करण्यात आले. या बैठकीस मराठा समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Bachchu Kadu : गेल्या 70 वर्षांत ओबीसी नेत्यांनी समाजासाठी काय केलं? आमदार बच्चू कडू यांचा ओबीसी नेत्यांवर निशाणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Pune Crime: सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
Uddhav Thackeray : इनकमिंग सुरु झालं पण उद्धव ठाकरेंनी अटी सांगितल्या, शिंदेंची साथ देणाऱ्या आमदारांना नो एंट्री, 'या' नेत्यांसाठी दारं खुली
आमदारांना नो एंट्री, पण या नेत्यांना परत घेणार, उद्धव ठाकरेंनी दीपेश म्हात्रेंच्या प्रवेशावेळी निकष सांगितले
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navratri 2024 | नवरात्रौत्सवातील आजचा दिवस महागौरीचा! प्रसिध्द गायिका सौ.पद्मा सुरेश वाडकर 'माझा'वरABP Majha Headlines : 7 AM : 7 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 7 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSuraj Chavan Bigg Boss Marathi Winner : मजुरी करणारा सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस' 5 मराठीचा विजेता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Pune Crime: सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
Uddhav Thackeray : इनकमिंग सुरु झालं पण उद्धव ठाकरेंनी अटी सांगितल्या, शिंदेंची साथ देणाऱ्या आमदारांना नो एंट्री, 'या' नेत्यांसाठी दारं खुली
आमदारांना नो एंट्री, पण या नेत्यांना परत घेणार, उद्धव ठाकरेंनी दीपेश म्हात्रेंच्या प्रवेशावेळी निकष सांगितले
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Mhada Lottery 2024 : म्हाडाची 2030 घरांची सोडत काही तासांवर, मुंबईतील घराचं स्वप्न पाहणारांची धाकधुक वाढली, थेट प्रक्षेपण कुठं पाहता येणार?
म्हाडाची 2030 घरांची सोडत काही तासांवर, मुंबईत सोहळ्याचं आयोजन, थेट प्रक्षेपण कुठं पाहणार?
Nashik Accident: कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, कारचा चुराडा, पत्रा कापून जखमींना बाहेर काढलं
नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरचा ब्रेक फेल, कारचा पार चुराडा
Vikas Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा
लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget