एक्स्प्लोर

माझ्यासोबत घातपाताचा प्रकार,अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

Manoj Jarange : पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात देखील घेतले असून, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी यांना माहिती दिली असल्याचं जरांगे म्हणाले आहेत.

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहे. नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असतांना सालेर किल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. सोबतच आपल्याही जीवाला धोका असू शकतो, पण याला आम्ही घाबरत नाही. तसेच अशा घटनांची भुजबळांप्रमाणे कुठेही वाच्यता करत नसल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत. 

मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून, या काळात आपण ना पाणी घेणार, ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. याचवेळी बोलतांना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून, अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात देखील घेतले होते, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी यांना माहिती दिली असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. 

साल्हेर किल्ल्याजवळ हल्ल्याचा प्रयत्न? मनोज जरांगेंनी सांगितला संपूर्ण किस्सा

दरम्यान याबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, 'आम्हाला भीती असून देखील आम्ही सांगत नाही. आमच्यासोबत 7 वेळ अशा घटना घडल्या, मात्र याबाबत आम्ही कुठेच जाही सांगत नाही. साल्हेर किल्ल्याजवळ आमच्या गाडीवर टेम्पो आला होता, पण आम्ही सरंक्षणाची मागणी केली नाही. तसेच आमच्यासोबत घातपाताचा प्रकार घडला म्हणून देखील कुठे सांगितले नाही. आम्ही साल्हेर किल्ल्यावर गेलो होतो. सर्व गाड्या खाली लावण्यात येतात. मात्र, वरती अचानक कुठूनतरी एक पिकअप तिथे आले. मला त्यावेळी ते लक्षात आले नाही. पण दर्शन करत असतांना पोलीस लवकर चला म्हणून गरबड करत असल्याने मला शंका आली. त्यामुळे खाली काहीतरी घडलं असल्याचे मला जाणवले. पण पोलिसांनी नेमकं काय घडलं याबाबत मला कळूच दिले नाही. पण, पिकअप सारखी एक गाडीचे ब्रेक खराब झाले म्हणून जोरात वरून खाली आली. प्रचंड वेगाने आलेली ही गाडी आमच्या अंगावर आली असती तर आमचा भुगा झाला असता. पण एकाने जोराने आवाज दिल्याने लोकं उड्या मारून बाजूल पडले. पोलिसांनी त्या गाडीच्या चालकाला पकडले असता, त्याने कोणाचातरी नवा घेऊन मला पिकअप घालण्याचे सांगण्यात आल्याचं म्हटले. हा सर्व प्रकार खरं आहे की खोटा आहे याबाबत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीकडे केली असल्याचे जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण; म्हणाले आता माघार नाहीच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget