एक्स्प्लोर
Advertisement
Jalna News : जालना शहरात 14 एप्रिलला वाहतुकीच्या मार्गात बदल, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे प्रशासनाचं आवाहन
Jalna Traffic Changes: जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात शुक्रवार 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपासून बदल करण्यात आला आहे.
Jalna Traffic Changes: जालना शहरात (Jalna City) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 14 एप्रिल रोजी शहरात पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीच्या वेळी अडथळा निर्माण होवू नये, रस्ता मोकळा रहावा व रस्त्यावर वाहने उभी करुन मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यादृष्टीने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात शुक्रवार 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपासून बदल करण्यात आला असून नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्यात यावा, असे आदेश पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी जारी केले आहेत.
जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल पुढीलप्रमाणे करण्यात आला आहे.
- मोतीबाग कडून शनिमंदिर गांधी चमन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मस्तगड, मंमादेवीमार्गे नवीन जालनामध्ये जाणारी वाहतूक मोतीबाग, सिटीझन टी पॉईन्ट भोकरदन नाका, बसस्थानक या मार्गे जाईल व येईल.
- अंबड चौफुली नुतन वसाहतकडुन शनिमंदीर, गांधीचमन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मस्तगड, मंमादेवी मार्गे नवीन जालनामध्ये जाणारी वाहतूक ही मोतीबाग, सिटीझन टी पॉईन्ट, भोकरदन नाका, बसस्थानक या मार्गे जाईल व येईल.
- रेल्वे स्टेशन, नगर परीषद, गांधीचमन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मस्तगड, मंमादेवीमार्गे नवीन जालनामध्ये जाणारी वाहतुक ही रेल्वे स्टेशन, नूतन वसाहत, अंबड चौफुली, मंठा चौफुली, नाव्हा चौफुली, जिजामाता प्रवेशद्वारमार्गे जाईल व येईल.
- माळीपुरा, दिपक हॉस्पीटल, टाऊन हॉल परिसरातील गांधी चमन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मस्तगड, मंमादेवी मार्गे नवीन जालनामध्ये जाणारी वाहतूक ही दिपक हॉस्पिटलजवळून जामा मस्जीद चौक, कैकाडी मोहल्ला, राजावाग सवार दर्गा, रामतीर्थ मार्गे किंवा जामा मस्जीद चौक, विठ्ठल मंदीर, पेशवे चौक, लक्कड कोट किंवा गांधी चमन, विठ्ठल मंदीर, पेशवे चौक, लक्कड कोट मार्गे जाईल व येईल.
- रेल्वे स्टेशन, निरामय हॉस्पिटल, मंमादेवीमार्गे नविन जालनामध्ये जाणारी वाहतुक ही निरामय हॉस्पिटल जवळून सुभद्रा नगर, ग्लोबल गुरुकुल, मंठा चौफुली, नाव्हा चौफुली, जिजामाता प्रवेशद्वार मार्गे जाईल व येईल.
- बसस्थानकावरुन, फुलंब्रीकर नाट्यगृह आणि, ट्राफिक ऑफीस रोडकडून येणारी व सुभाष चौक मार्गे मंमादेवी, जुना जालनामध्ये जाणारी वाहतूक ही बसस्थानकवरुन, लक्कडकोट, पेशवे चौक, विठ्ठल मंदीर, गांधी चमन किंवा जामा मस्जीद चौक, दिपक हॉस्पीटल किंवा रामतीर्थ, राजाबाग सवार दर्गा, कैकाडी मोहल्ला, जामा मस्जीद चौक मार्गे जाईल व येईल.
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुर्तीवेस, काद्राबाद पोलीस चौकी, पाणीवेस, गरीबशहा बाजार किंवा सुभाषचौक मार्गे मंमादेवी, जुना जालनामध्ये जाणारी वाहतुक ही गुरु गोविंदसींग नगर, रामनगर, गांधी नगर, बायपास रोड अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल किंवा मंगळ बाजार , चमडा बाजार, राजमहेल टॉकीज जवळील पुलावरुन, ग्लोबल गुरुकुल, अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल. किंवा मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहेल टॉकीजजवळील पुलावरुन सुभद्रा नगर, सोनल नगर, निरामय हॉस्पीटल मार्गे जाईल व येईल.
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नारायणा स्कुल, मंगळ बाजार, काद्राबाद पोलीस चौकीमार्गे पाणीवेसकडे येणारी वाहतुक मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहेल टॉकीज जवळील पुलावरुन, ग्लोबल गुरुकुल, अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल. किंवा मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहेल टॉकीज जवळील पुलावरुन सुभद्रा नगर, सोनल नगर, निरामय हॉस्पीटल मागे जाईल व येईल.
- सदर बाजार, सिंधी बाजार, रहेमान गंज कडुन येणारी व मामा चौक मार्गे, सुभाष चौक, मंमादेवी जुना जालनामध्ये जाणारी वाहतुक ही मामा चौक, दिपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कडकोट पेशवे चौक, विठ्ठल मंदीर गांधी चमन किंवा जामा मस्जीद चौक, दिपक हॉस्पिटल किंवा रामतीर्थ, राजाबाग सवारदर्गा, कैकाडी मोहल्ला, जामा मस्जीद चौक मार्गे जाईल व येईल.
इतर महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
अहमदनगर
मुंबई
Advertisement