एक्स्प्लोर

Crime News : पत्नी प्रियकरासोबत पळून गेली, संतापलेल्या जावयाने सासऱ्यालाच संपवले

Jalna Crime News : अंबडच्या शारदानगर येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

Jalna Crime News: जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली असून, जावयाने सासऱ्याची गोळ्या झाडून केली हत्या (Murder) केली आहे. पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने याचा राग पतीला आला होता. त्यामुळे त्याने पत्नीच्या वडिलाचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंबडच्या शारदानगर येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे अंबड परिसरात खळबळ उडाली आहे. पंडित भानुदास काळे असे मयताचे नाव असून, किशोर शिवदास पवार असे संशियत आरोपीचे नाव आहे. दरम्यान हत्या केल्यावर आरोपीने घटनास्थळवरून पळ काढला आहे

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंडित भानुदास काळे यांची मुलगी नंदा काळे हिचा विवाह छत्रपती संभाजीनगरच्या आडूळ येथील किशोर शिवदास पवार याच्यासोबत झाला होता. सर्व काही सुरळीत सुरु होते. दरम्यान त्यांना दोन मुली व दोन मुले झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागल्याने दोघांचे पटत नव्हते. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या एका व्यक्तीसोबत नंदा काही दिवसांपूर्वी पळून गेली. त्यामुळे याचा राग आल्याने किशोर नेहमी सासरी जाऊन सासरा पंडित काळे यांच्यासोबत वाद घालून, त्यांना शिवागाळ करीत होता. तसेच माझ्या पत्नीला सासरी नांदायला पाठावा, अन्यथा तुम्हाला बघून घेईल अशा धमक्या देखील देत होता. 

थेट गोळ्या घालून केली हत्या...

दरम्यान, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास किशोर पवार आणखी दोघांना सोबत घेऊन  शारदानगरला आला. यावेळी पंडित काळे व त्यांचा मुलगा पारलेश काळे दोघेही घरीच होते. यावेळी किशोरने पुन्हा शिवीगाळ सुरु करत पंडित काळे यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने काळे यांना मारहाण करायला सुरवात केली. तसेच कुणाला काही कळण्याच्या आता त्याने कंबरेची बंदूक काढून त्याने पंडित काळे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात पंडित काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर काळे यांचा जीव गेल्याचे लक्षात येताच त्याने आपल्या साथीदारांस तेथून पळ काढला. 

पोलिसांची घटनास्थळी धाव... 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे देखील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी मंदाकिणी भोसले यांच्या फिर्यादीवरून तीन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या :  

Jalna Crime : ट्रक चालक चांगली वागणूक देत नसल्याने क्लीनरने काढला काटा; जालना जिल्ह्यातील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Ravindra Chavan: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात अर्तक्य हालचाली, श्रीकांत शिंदेंचा कट्टर समर्थक ठाकरेंकडे, रवींद्र चव्हाणांना विधानसभेला घेरण्याची तयारी?
दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर डोंबिवलीत वेगळीच चर्चा, रवींद्र चव्हाणांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय मोहीम?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : 08 Oct 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Metro 3:आरे ते बीकेसी भुयारी मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत,तासाभराचा प्रवास अवघ्या 22मिनिटांवरTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 6 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Ravindra Chavan: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात अर्तक्य हालचाली, श्रीकांत शिंदेंचा कट्टर समर्थक ठाकरेंकडे, रवींद्र चव्हाणांना विधानसभेला घेरण्याची तयारी?
दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर डोंबिवलीत वेगळीच चर्चा, रवींद्र चव्हाणांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय मोहीम?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Embed widget