Jalna Crime : ट्रक चालक चांगली वागणूक देत नसल्याने क्लीनरने काढला काटा; जालना जिल्ह्यातील घटना
Jalna Crime News: हत्या (Murder) करून फरार झालेल्या क्लीनरला गोंदी पोलिसांनी इंदोर येथून रविवारी ताब्यात घेतले आहे.
![Jalna Crime : ट्रक चालक चांगली वागणूक देत नसल्याने क्लीनरने काढला काटा; जालना जिल्ह्यातील घटना maharashtra News Jalna Crime cleaner killed the truck driver Jalna Crime : ट्रक चालक चांगली वागणूक देत नसल्याने क्लीनरने काढला काटा; जालना जिल्ह्यातील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/58a1248356e16bcb134884655d5222861679910158556443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalna Crime News: किरकोळ कारणावरून होणाऱ्या वादाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, याच वादातून थेट जीवघेण्यापर्यंतच्या घटना देखील समोर येत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात (Jalna District) अशीच काही घटना समोर आली आहे. चांगली वागणूक देत नाही म्हणून जबर मारहाण करून ट्रकचालकाचा क्लीनरने खून केला आहे. हत्या (Murder) करून फरार झालेल्या या क्लीनरला गोंदी पोलिसांनी इंदोर येथून रविवारी ताब्यात घेतले आहे. विनोद रावत ( वय 32 वर्षे, रा. इंदोर, मध्य प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून, सीताराम अमरसिंग निंगवाल (वय 45 वर्षे, रा. कानपूर, जि. धार, कर्नाटक) असे मयत ट्रक चालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक सीताराम निंगवाल हे क्लिनर विनोद रावतसोबत कर्नाटकहून इंदोरकडे माल घेऊन निघाले होते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर-बीड राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाट्याजवळ विनोद रावतने सीताराम निंगवाल यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर पान्याने वार करून खून केला. नंतर तो तेथून फरार झाला. कंपनीच्या लोकांनी सीताराम निंगवाल यांच्याशी संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी ट्रकचा शोध घेतला असता, ट्रॅकमध्ये सीताराम निंगवाल यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आढळून आला होता. याची माहिती गोंदी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आरोपीचा शोध सुरु केला होता.
इंदोर येथून पोलिसांनी घेतलं ताब्यात
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असता, क्लिनर विनोद रावतनेच सीताराम निंगवाल यांची हत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत त्याचा शोध घेतला असता तो इंदोरमध्ये असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांच्या एका पथकाने अखेर त्याला रविवारी इंदोर येथून ताब्यात घेतले आहे. तर ट्रक चालक सीताराम निंगवाल हे चांगली वागणूक देत नसल्यामुळे हा खून केल्याची कबुली त्याने गोंदी पोलिसांना दिली आहे.
यांनी केली कारवाई...
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर - पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप, पीएसआय गणेश राऊत, पोलिस कॉन्स्टेबल करंडे, कोलगुडे यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Crime News : आईच्या सांगण्यावरून आठ वर्षांच्या सावत्र भावाचा खून; तोंडात, नाकात माती घालून गळा आवळला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)