Jalna News: दिवसा कप-बशी विक्री करायचा अन् रात्रीच्या वेळी दुचाकी चोरायचा
Jalna Crime News: विशेष म्हणजे हा मोटारसायकल चोर दिवसा कप-बशी विक्री करायचा अन् रात्रीच्या वेळी दुचाकी चोरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
Jalna Crime News: गेल्या काही दिवसांपासून जालना शहरात (Jalna City) मोटारसायकल चोरीच्या (Crime) घटना वाढतान पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांकडून या मोटारसायकल चोरांचा (Motorcycle Thief) शोध घेतला जात आहे. अशातच एका मोटारसायकल चोराला जालना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या मोटारसायकल देखील जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे हा मोटारसायकल चोर दिवसा कप-बशी विक्री करायचा अन् रात्रीच्या वेळी दुचाकी चोरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. शेख आरेफ शेख मुख्तार (रा. इस्लामवाडी ता. जि. जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
शेख आरेफ शेख मुख्तार याने शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी केल्या असून, तो जमुनानगर भागात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन दुचाकी चोरीबाबत विचारपूस केली असता, त्याने कदीम पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून 50 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. तर त्याला कदीम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दिवसा कप-बशी विक्री करून रेकी करायचा...
शेख आरेफने मोटारसायकल चोरी केल्याचे कळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन, चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. तर तो दिवसभर शहरातील वेगवेगळ्या भागात कपाची विक्री करून दारोदारी फिरायचा. घरांची आणि त्यासमोर उभ्या असलेल्या गाड्यांची रेकी देखील करायचा. मग ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी दुचाकी चोरी करणाऱ्यासाठी घराबाहेर निघायचा. तसेच कोणती गाडी चोरायची याबाबत तो आधीच अंदाज लावून जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
यांनी केली कारवाई...
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, कैलास चेके योगेश सहाने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: