जालन्याच्या प्रसिद्ध 'मत्स्योदरी' देवीच्या मंदिरात चोरी, दानपेटी फोडून चोरट्यांनी लंपास केली रोख रक्कम
जालना जिल्ह्यातील अंबडच्या मत्स्योदरी देवीच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात मत्स्योदरी देवीच्या पुढेच असलेली दानपेटी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे.j
जालना : जालना (Jalna News) जिल्ह्यातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध अंबडच्या मत्स्योदरी देवीची दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम पळवल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार उघड होताच भाविकांना मोठा धक्का बसला आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे
जालना जिल्ह्यातील अंबडच्या मत्स्योदरी देवीच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात मत्स्योदरी देवीच्या पुढेच असलेली दानपेटी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. सकाळी 6 वाजता पुजाऱ्याने मंदिराचे दार उघडले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलीस या घटनेचा तपास करत असून श्वान पथकाच्या साह्याने घटनास्थळाची पाहणी केली आहे.
दरम्यान कालपासून मंदिराचे cctv तांत्रिक कारणाने बंद होते. त्यातच दर सहा महिन्यांनी ही दानपेटी उघडली जात असते. पुढील माहिन्यात ती उघडली जाणार होती. मात्र त्या पूर्वीच ही घटना घडल्याने पोलिसांचा या दिशेने पोलिसांचा तपास सुरु आहे. दरम्यान मंदिर संस्थानाचे अध्यक्ष तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अंदाजे दानपेटीत 5 ते 6 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवली आहे.
. जालना जिल्ह्यतील अंबड हे तालुक्याचे गाव आणि इथे वसलेली मत्स्योदरी देवी प्रसिद्ध आहे. या डोंगराचा आकार माशासारखा असल्यामुळे या देवीला हे नाव पडले आहे. हेत. उंचावर मंदिर असल्यामुळे इथून खालचा परिसर तसेच अंबड शहराचा देखावा फारच सुंदर दिसतो. . देवस्थान परिसर खूप प्रशस्त असून या ठिकाणी शारदीय नवरात्रामध्ये खूप मोठी जत्रा भरते.
मंदिराच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या मंदिरात प्रवेश करून दानपेटी पळवण्यापर्यंत आता चोरट्यांचे धाडस पोहोचल्याने आता पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न भाविक विचारात आहेत. ही चोरीची घटना कळल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या चोरीनंतर आता मंदिराच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला?
कुलस्वामिनी तुळजाभवानी (Tulja bhavani Temple) मातेच्या दागिन्यांवर (Ornaments) डल्ला कुणी मारला असा प्रश्न आता उपस्थि झाला आहे. तुळजाभवानी मातेचे 8 ते 10 मौल्यवान अलंकार गायब झाले असल्याचे उघड झालं आहे. एका अहवालानुसार, तुळजाभवानीला आतापर्यंत अर्पण करण्यात आलेल्या शिवकालीन दागिन्यांची आणि इतर सर्व मौल्यवान वस्तूंची मोजदाद करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने मंगळवारी आपला अहवाल सादर केला आणि याच अहवालात देवीचे अनेक मौल्यवान दागिने गायब असल्याचं उघड झालं आहे.