(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalna News: मोडकळीस आलेल्या शाळेच्या पत्र्यावर 3 दिवसांपासून उपोषण, आंदोलकाची तब्येत खालावली
Jalna News:जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या शाळेच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत सदस्याचे अनोखे आमरण उपोषण, आंदोलनाचा तिसरा दिवस
Jalna News: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या दाढेगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या मोडकळीस आलेल्या अवस्थेकडे पाहून गावातील ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांनी शाळेच्या छतावर बसून उपोषण सुरु केले. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून रात्रीपासून आंदोलक राजू काकडे यांची तब्येत खालावली आहे.
मोडकळीस आलेली इमारत प्रशासनाने नव्याने बांधून द्यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे हे शाळेच्या छतावरच उपोषणाला बसलेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा पुढील गोष्टी शासन जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था
जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था पाहून शाळेची दुरुस्ती आणि नवीन इमारत बांधून देण्यासाठी शाळेच्या पत्र्यावर बसून आंदोलक काकडे यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. मोडकळीस आलेल्या शाळेच्या पत्र्यावर शाहू, फूले, आंबेडकरांच्या प्रतीमा ठेवत त्याबाजूला आमरण उपोषणाचा फलक लावण्यात आला आहे. शाळेची इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
या शाळेत इयत्ता १ ली ते ७वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेची इमारत प्रशासनाने नव्याने बांधून द्यावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्याने हे उपोषण सुरु केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून रात्रीपासून आंदोलक राजू काकडे यांची तब्येत खालावली आहे. भरपावसात ते उपोषण करत असून दुरुस्तीसाठी प्रशासनाने लवकर हलचाली करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा: