एक्स्प्लोर
Operation Sindoor: '...त्यांचं कोर्ट मार्शल करा', Operation Sindoor वरून Sanjay Raut सरकारवर संतप्त
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'पीओकेवर कब्जा मिळवण्याचं आमचं ध्येय कधीच नव्हतं' या विधानावर राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं कोर्टमार्शल केलं पाहिजे', असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सैन्याच्या कारवाईत धर्म आणि जात आणून मतांचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने पीओके परत आणण्याचे आश्वासन दिले होते, पण आता संरक्षण मंत्री वेगळेच विधान करत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रकरणी पंतप्रधानांनी मौन बाळगल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















