PAK vs SA : रबाडानं पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं नंतर दक्षिण आफ्रिकेसमोर पाकच्या टॉप ऑर्डरचं लोटांगण, पराभवाचं सावट
PAK vs SA Test: दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 404 धावा केल्या. रावळपिंडीत सुरु असलेल्या कसोटीत पाकिस्तानवर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 71 धावांची आघाडी मिळवली.

रावळपिंडी : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पाकिस्ताननं पहिल्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा संघ संकटात सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कगिसो रबाडानं अकराव्या स्थानावर फलंदाजीला येत 71 धावा केल्या आहेत. रबाडाच्या फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 404 धावा केल्या यामुळं आफ्रिकेला 71 धावांची आघाडी मिळाली.
रावळपिंडी कसोटीत पाकिस्ताननं पहिल्या डावात 333 धावा केल्या. केशव महाराजनं 7 विकेट घेतल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 404 धावा केल्या. अकराव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या कगिसो रबाडानं 71 धावांची खेळी केली.रबाडानं शेवटच्या विकेटसाठी केलेल्या फलंदाजीनं पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं.दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात अखेरच्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी झाली.
दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्स आणि टोनी डी जॉर्जी यांनी अनुक्रमे 76 आणि 55 धावा केल्या. सेनुरन मुथुस्वामी यानं नाबाद 89 धावा केल्या. तर, कगिसो रबाडा यानं 71 धावांची खेळी केली. रबाडाच्या या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 404 धावा केल्या.
पाकिस्तान संकटात
पाकिस्ताननं पहिल्या डावात 333 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानची टॉप ऑर्डर अयशस्वी ठरली. इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, शान मसूद, साऊद शकील हे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. सध्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान फलंदाजी करत आहेत. कॅप्टन शान मसूद शुन्यावर बाद झाला. बाबर आझम सध्या 40 धावांवर फलंदाजी करत आहे.
पाकिस्तानची मालिकेत आघाडी
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पाकिस्ताननं पहिली कसोटी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं सामन्यावर पकड मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 2025 मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजेतेपद मिळवलं होतं.




















