एक्स्प्लोर

अंतरवाली दगडफेक प्रकरणी राजेश टोपेंची सीबीआय चौकशी करा, देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणची मागणी

Jalna : आंदोलनात गरबड झाल्यास पोलिसांवर दगडफेक करण्याचे राजेश टोपे आणि त्यांच्या स्वीय सहायकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्लॅन होता असा आरोप करण्यात आला आहे.

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण सुरु असतांना, पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणकडून राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. "पोलिसांवर दगडफेक करण्याचा आधीपासूनच प्लॅन करण्यात आला होता. आंदोलनात गरबड झाल्यास पोलिसांवर दगडफेक करण्याचे राजेश टोपे (Rajesh Tope) आणि त्यांच्या स्वीय सहायकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्लॅन होता असा आरोप देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आसाराम डोंगरे यांनी केला आहे. या बाबत जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले आहे. 

पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा समाज बांधवाचे उपोषण चालु होते. तेथे पोलीस बंदोबस्त होता. या पोलीस बंदोबस्तामध्ये काही समाजकंटक व जातीवादी लोक बाहेर गावावरून आले होते. तसेच हे लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शहागड व बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील असुन, या समाजकंटकाने पोलीस बांधवावर घरावरती जाऊन दगडफेक केली. सदरील दगडफेक केल्यामुळे आंदोलन चिघळले आणि नाईलाजास्तव पोलीस बांधवाना लाठीचार्ज, अश्रुधारचा मारा करावा लागला.

तर, 27 ऑगस्ट रोजी आमदार राजेश टोपे व त्यांच्या कार्यकर्त्यांची अंकुश सहकारी साखर कारखाना येथे एक गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत सदरील मराठा समाज बांधवाच्या उपोषाणामध्ये काही गडबड झाली तर पोलीसांवर हल्ला करण्याचा प्लॅन आखला गेला होता. त्यामुळे, आमदार राजेश टोपे व त्यांचे स्विय सहाय्यक, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलीस व सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 

जरांगे यांचा सरकारवर आरोप...

दरम्यान एकीकडे राजेश टोपे यांच्यावर देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणने गंभीर आरोप केले असतांना, दुसरीकडे मनोज जरांगे यांनी लाठीचार्ज सरकारच्या आदेशानेचं झाला असल्याचा आरोप केला आहे. बीड येथील दौऱ्यात असतांना जरांगे म्हणाले की, “अंतरवाली सराटी गावात सुरु असलेले आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारचे डावपेच खेळण्यात आले. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला आपण सोडणार नाहीत, असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आंदोलन चिघळण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये महिला आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणात जखमी झाले. एवढं होऊन देखील सरकारने अद्यापही लाठीचार्ज का केला? याचे उत्तर दिलेलं नाही, असे जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manjo Jarange : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील दोन दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर, आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा

महत्त्वाच्या बातम्या

कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget