मोठी बातमी : पायलटचा विमान उड्डाण करण्यास नकार, एकनाथ शिंदेंचे विमान जळगाव विमानतळावर रखडले
Pilot refuses to take off Eknath Shinde plane : पायलटचा विमान उड्डाण करण्यास नकार, एकनाथ शिंदे यांचे विमान जळगाव विमानतळावर रखडले

Pilot refuses to take off Eknath Shinde plane : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जळगाव दौऱ्यावरुन परत येत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विमान जळगाव विमानतळावर रखडले आहे. विमानाच्या वैमानिकाने विमान उड्डाणास नकार दिल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विमानाचे उड्डाण रखडल्याची माहिती समोर आली आहे.
वैमानिकांच्या ड्युटीची वेळ संपली असल्याने पुन्हा परवानगी घेण्यास काही वेळ लागतो. त्यामुळे परवानगी मिळेपर्यंत वैमानिकांनी नकार दिला होता. आता विमान निघणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, वैमानिकाने विमान उड्डाण करण्यास नकार दिल्याने मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी व विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून वैमानिकांची मनधरणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या 20 मिनीटांपासून एकनाथ शिंदे विमान उड्डाणाच्या प्रतीक्षेत आहे.
अखेर एकनाथ शिंदे यांचे विमान मुंबईकडे रवाना
वैमानिकांच्या प्रकृतीसह त्याच्या वेळेचा किरकोळ विषय होता. त्याच्या कंपनीशी बोलणं करून एकनाथ शिंदे यांचे विमान रवाना झाल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले, पायलटच्या तब्येतीची अडचण होती. त्यातही वेळेची अडचण होती. टेक्निकल अडचण होत्या. त्यांच्या कंपनीशी आम्ही बोललो. त्यावेळी त्यांनी पायलटला त्यांच्या भाषेत समजावलं. किरकोळ अडचण होती, विमानात उडालेलं आहे. एका तासात आता मुंबईला पोहोचतील.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी काँग्रेसला सोलापुरात मोठे धक्के दिले. काँग्रेस नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर एकनाथ शिंदे पुण्यातील एका कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि त्यानंतर ते जळगावात गेले होते. मात्र, जळगाव येथून मुंबईला रवाना होत असताना शिंदेंचं विमान रखडलेले पाहायला मिळालं.
गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी जय श्रीराम म्हणत दोघी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या विषयावर बोलण्याचे टाळले. जय श्रीराम म्हणत पुढे निघाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या























