एक्स्प्लोर

जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व; विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली, म्हणूनच पराभव; एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

Jalgaon Dudh Sangh Elections: जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी. तर मंदा खडसे यांचा निवडणुकीत पराभव.

Jalgaon Dudh Sangh: जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Elections) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी झाले आहे. तर एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. आम्हाला परभव मान्य आहे, पण विरोधकांनी खोक्याची ताकद लावून निवडणूक जिंकली असल्याचा आरोपही यावेळी बोलताना एकनाथ खडसेंनी केला आहे. 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलच्या पराभवानंतर एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी हा पराभव मान्य असल्याचं सांगत विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली. त्यापर्यंत आम्ही गेलो नाही. खोक्याचा दबाव, आर्थिक बळावर विरोधकांनी ही निवडणूक जिंकल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी यावेळी बोलताना केला आहे. 

एकनाथ खडसे यावेळी बोलताना म्हणाले की, "विरोधी पक्षाकडून खोक्यांसह साम-दाम-दंड भेद नीतीचा वापर केला गेला, त्यामुळेच आम्हाला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. मात्र पराभव शेवटी पराभव असतो, तो आम्हाला मान्य आहे." तसेच, यावेळी बोलताना एकनाथ खडसेंनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं." 

"नव्यानं निवडून आलेल्या संचालकांनी चांगल काम करून दाखवावं ही अपेक्षा आहे. ही निवडणूक लागली असताना तिला ब्रेक दिला गेला, नंतर पुन्हा निवडणूक जाहीर केली, असं राज्यात पहिल्यांदाच घडलं आहे. या निमित्तानं आम्हाला गाफील ठेवण्यात आलं आहे. या निवडणुकीत आम्ही निवडून येऊ अशी परिस्थिती होती. आम्ही सत्तेवर असताना चांगल्या प्रकारे  आणि पारदर्शी पणानं संघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असला तरी कमी मताच्या फरकानं अनेक जागा गेल्या आहेत. आमच्या विरोधात दोन सत्ताधारी मंत्री, दोन खासदार, आमदार एवढे जण होते. त्याचाही विचार केला गेला पाहिजे, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. भाजप सोडल्यामुळे आमची माणसं त्यांनी त्यांच्याकडे फोडल्याचं पाहायला मिळतंय.", असं सांगत झालेला पराभव आपल्याला मान्य असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. 

एकनाथ खडसेंच्या गडाला सुरुंग

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) मोठा धक्का बसला आहे. खडसेंचं वर्चस्व असलेल्या जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटानं (BJP-Shinde group) विजय मिळवला आहे. एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे (Manda Khadse) यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. खडसे यांच्या गटाला केवळ चार जागा  मिळाल्या आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Embed widget