एक्स्प्लोर

Manoj Jarange : बळीराजासाठी जरांगेचा पुढाकार, मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांसाठी लढा देणार; जरांगेंचे एल्गार

Maratha Reservation : ''शेतीविषयक सगळ्याच नेत्यांची उदासीनता आहे, मी माझ्या डोळ्याने बघतोय. आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणार'', असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange News : मराठा आरक्षणानंतर (Maratha Reservation) शेतकऱ्यांसाठी (Farmer) पुढचा लढा (Protest) आपण देणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी एबीपी माझाशी बातचीत करताना केलं आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. 'शेतीविषयक सगळ्याच नेत्यांची उदासीनता आहे, मी माझ्या डोळ्याने बघतोय. शेतकऱ्यांचे प्रचंड वाईट हाल आहेत. मराठवाड्यात आणि विशेषता खानदेशात या नेत्यांना पाणी आणायला काय रोग झालाय का? शेतकऱ्यांना मदत सुद्धा वेळेवर मिळत नाही एक रुपयाचा विमा काढून ठेवलाय, तो काय कामाचा नाही. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आज या अस्मानी संकटामुळे शेतकरी बेजार झाला आहे, फाशी घ्यायला लागलाय शेतकऱ्यांना तुम्हाला आडवं केल्याशिवाय पर्याय नाही. आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणार'', असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

'ओबीसींचा नेता म्हणत जातिवाद करण्याचा प्रयत्न'

ओबीसी नेत्यांकडून जातिवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.मराठा आरक्षणासाठी आम्ही मुदत दिलेली नाही, सरकारने मुदत मागितली होती. 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला वेळ द्या आम्ही आरक्षण मिळवून देतो, असं सरकारनं सांगितलं होतं. नोंदणीच्या आधारावर कायदा पारित करून आरक्षण देऊ असे सांगण्यात आले होते, पण काही लोक स्वतःला ओबीसींचा नेता म्हणत जातिवाद करण्याचा प्रकार करत आहेत. धनगर, वंजारी यांचा आरक्षणाला धक्का लागणार नाही, कारण त्यांचा प्रवर्ग वेगळा आहे. आम्ही ओबीसी आरक्षणातून आरक्षण मागत आहोत, तो आमचा हक्क आहे, त्यात काही गैर नाही, धनगर बांधवांचा गैरसमज होतो आहे. तो फक्त धनगरांचा वापर करत आहे. धनगर आरक्षणाबद्दल त्याची भूमिका तो मांडत नाही त्याने भूमिका स्पष्ट करायला हवी. मंत्री छगन भुजबळ यांचं नाव न घेता मनोज जरांगे यांनी टोला लगावला आहे. धनगर वंजारी समाजाने मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. अशी विनंती ही त्यांनी केली

जरांगेंचा भुजबळांवर निशाणा

जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधत म्हटलं आहे की, महापुरुषांचा जाती काढतो. तो ओबीसींचा नेता म्हणून घेतो स्वतःला, त्यांचा ऐकून तुम्ही आमच्यावर अन्याय करणार का, हे आम्ही सहन करणार नाही. त्याचं ऐकून जातीय तणाव निर्माण करू नका. आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे. आता नोंदी मिळाल्यात त्या नोंदीच्या आधारावर मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध झाला आहे. तरीही हा छगन भुजबळ म्हणतो, मराठ्यांना आरक्षण देऊ नका तर तुम्ही त्याचं कसं ऐकू शकता. बदनापूरच्या आमदाराने विनाकारण रावसाहेब दानवे यांचे नाव घेतलं, ओबीसी नेते आता त्यांचं नाव घ्यायला लागले, म्हणजे भाजपचे नेते आमचा गेम करायला लागले आहे, का असा सवाल जरांगे यांनी विचारला आहे.

'गिरीश महाजन यांना सरकार अडचणीत आणायचंय?'

''गिरीश महाजन यांना कदाचित माहीत नसेल सरकारचं आणि आमचं ठरलं आहे. सरकारने मला सांगितले आरक्षण आम्ही देणार हे त्यांनाही माहित आहे, त्यांनी विनाकारण वातावरण खराब करू नये. याचा महाराष्ट्रात काय परिणाम होणार आहे, याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. देवेंद्र फडणवीस अडचणीत आले नाही पाहिजे, याची काळजी त्यांनी घ्यावी, यांनी असं बोलणं योग्य नाही. गिरीश महाजन यांना सरकार अडचणीत आणायचे आहे का हे त्यांनी ठरवले आहे का?'' असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget