(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gulabrao Patil : पवार -फडणवीस शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करतील, संजय राऊतांच वक्तव्य, गुलाबराव पाटील म्हणाले...
Gulabrao Patil : 'मी संजय राऊत यांना भाव देत नाही', अस उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.
Gulabrao Patil : अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांच्या आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असे विधान ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केलं होतं. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'मी संजय राऊत यांना भाव देत नाही', अस उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. याचबरोबर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पूर (Buldhana Flood) परिस्थितीचा आढावा घेतला असून सद्यस्थितीत एसडीआरएफचे पथक बचावकार्य करत असून दोन हेलिकॉप्टरची मदत घेतली असल्याचे ते म्हणाले.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जळगाव (Jalgaon) जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला आहे. जामोद आणि संग्रामपूर या गावांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता या ठिकाणी एसटीआरएफची टीम रवाना केली आहे. मात्र आता पाऊस बंद झाल्यामुळे या ठिकाणच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. येथील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तलाठी, तहसीलदार हे नियुक्त करण्यात आलेले आहे. प्रत्येक मिनिटाचा आपण त्यांच्याकडून आढावा घेत असून पूर परिस्थिती असल्यामुळे सद्यस्थितीत पंचनामे करणे योग्य होणार नाही, जसं जसं पाणी कमी होईल, त्यानंतर नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरवात केली जाईल. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे पाटील म्हणाले.
दरम्यान जळगाव जिल्ह्यातील प्रशासनाचे आढावा बैठक आज पार पडली आहे. दोन ते तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे ते नुकसान झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत योग्य ते उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. शेतांचे नुकसान, शाळा, धरणांचा पाणी अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील तीन मंत्री असल्यामुळे प्रत्येकाने पाहण्यासाठी भाग हे वाटून घेतले आहेत. त्या पद्धतीने प्रत्येक नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जात आहे. उद्याच्या दिवशी कुठलीही अडचण किंवा समस्या उद्भवणार नाही. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून ही बैठक पार पडली.
जळगाव जिल्ह्यात वाश आऊट मोहीम
एक विशिष्ट प्रकारेचे अवैध दारू ही विक्री होत असून त्यामुळे अनेकांना मृत्यू ओढावत असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात वाश आऊट मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कोणत्याही पक्षाच्या लोकांनी अशा गोष्टींना आश्रय देऊ नये. मात्र विरोधकांचं काम असतं टीका टीपणी करायचं, त्यामुळे ते टीका करतात. त्यामुळे ही अवैध दारू हद्दपार कशी होईल, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
मंत्री अनिल पाटील म्हणाले.
यवतमाळ महागाव येथे नदीच्या पलीकडे 40 ते 45 जण अडकल्याचे सकाळी समोर आले. अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी एसडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून दोन हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे 45 जण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनास्थळी सर्व प्रशासकीय अधिकारी व दोन एसडीआरएफच्या तुकड्या दाखल झाले असून घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.